शेतीच्या वादातून शेतकर्‍याची निर्घुण हत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीच्या वादातून शेतकर्‍याची निर्घुण हत्या.

आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे तीन पथक रवाना

औरंगाबाद प्रतिनिधी- औरंगाबाद(Aurangabad) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. जनार्ध

पुण्यात इंजिनिअर तरूणीची गोळ्या झाडून हत्या
पुण्यात तरुणाचा धारदार शस्त्राने खून
परभणी, बीड प्रकरणी विरोधक आक्रमक ; पहिल्याच दिवशी सभागृहाचे कामकाज स्थगित

औरंगाबाद प्रतिनिधी- औरंगाबाद(Aurangabad) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. जनार्धन कासार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. जनार्धन हे आपल्या शेतात कामाला गेले असता त्यांच्यावर शिवाजी अवताडे, बाळू अवताडे, गिरीजा अवताडे , भारत अवताडे आणि महादू अवताडे या आरोपींसह सात ते आठ जणांनी हल्ला चढवला. या हल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृतव्यक्तीच्या नातेवाईकांनी घेतली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे तीन पथक रवाना झाले आहेत अशी माहिती चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास गात यांनी दिली आहे.

COMMENTS