Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 60 फूट खोल विहिरीत उतरून शेतकऱ्याने वाचवले हरणाच्या पाडसाचे प्राण

नाशिक प्रतिनिधी - 60 फूट खोल विहिरीच्या पाण्यात हरणाचे पाडस पडले असता शेतकरी स्वतः विहिरीत उतरत सुखरूपरित्या पाडसाला बाहेर काढल्याने प्राण व

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विकास निधी तून उभारलेल्या आरोग्य केंद्राची दुरवस्था   
पंढरपूर पोटनिवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार : राजू शेट्टी
पाचशे टन वजनाचा पूल चोरीला !

नाशिक प्रतिनिधी – 60 फूट खोल विहिरीच्या पाण्यात हरणाचे पाडस पडले असता शेतकरी स्वतः विहिरीत उतरत सुखरूपरित्या पाडसाला बाहेर काढल्याने प्राण वाचवले आहे.येवला तालुक्यातील देशमाने येथे येथील शेतकरी विनायक राठोड यांच्या विहिरीत हरणाचे पाडस पडले असता शेतकऱ्याच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्वरित वन विभागाला दूरध्वनीवरून संपर्क केला असता घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल होत झाले.यावेळी ६० फूट खोल विहिरीत शेतकरी विनायक राठोड स्वतः उतरत वन कर्मचारी व स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पडलेला हरणाच्या पाडसाचे प्राण वाचवत सुखरूप विहिरीच्या बाहेर काढत त्याला त्याच्या अधिवासात सोडून दिले. यावेळी वन परिक्षेत्रधिकारी अधिकारी अक्षय मेहेत्रे  यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर वनरक्षक गोपाल राठोड व वनरक्षक येवला पंकज नागपुरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने पाडसाला जीवदान दिले.

COMMENTS