Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेचा एकाविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कोपरगाव/प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील रिद्धी-सिद्धी नगर येथील राष्ट्रवादीचा कार्यकर्ते व फिर्यादी शैलेश साबळे यांचे घराचा आरोपी सोबत सौदा करून तो व

अब्दुल सत्तार भावणिक माणुस आहे  – राधाकृष्ण विखे पाटील
श्रीरामपूरची ‘वाचन संस्कृती’जीवनमूल्ये जोपासणारी : डॉ.अनंता सूर
बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या अधिकार्‍यांची सेवा खंडित करणार

कोपरगाव/प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील रिद्धी-सिद्धी नगर येथील राष्ट्रवादीचा कार्यकर्ते व फिर्यादी शैलेश साबळे यांचे घराचा आरोपी सोबत सौदा करून तो व्यवहार पूर्ण न करता ते आपले घर नुकतेच साफ करण्यासाठी गेले असता आरोपी प्रकाश मनोहर खरे, त्यांची पत्नी व खरे यांची मुलगी आदींनी नुकताच फिर्यादी सोबत वाद करून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती या पार्श्‍वभूमीवर आज मात्र साबळे यांचे विरुद्ध फिर्यादी महिला गायत्री प्रकाश खरे हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात साबळे विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरतील रहिवासी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फिर्यादी शैलेश साबळे यांचा आरोपी प्रकाश मनोहर खरे यांच्यात सन-2020 मध्ये घर खरेदीचा व्यवहार झाला होता. परंतु आरोपी हा व्यवहार पैसे देऊन पूर्ण करत नव्हते. त्यामुळे फिर्यादी शैलेश साबळे हे आपल्या घराची साफसफाई करण्यासाठी 11 मे रोजी दुपारी 4.30 वाजता आपल्या नातेवाईकांसोबत गेले असता, आरोपी प्रकाश खरे व त्याची पत्नी गायत्री खरे व त्यांची मुलगी पूर्ण नाव माहिती नाही आदींनी त्यांना शिवीगाळ करून त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून त्यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटास चावा घेतला होता. व त्यांना जखमी केले होते. व त्यांच्या खिशातून खाली पडलेला भ्रमणध्वनी हा लंपास केला असल्याचा आरोप करुन त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असताना काल रात्री उशिरा 10.29 वाजता आरोपी गायत्री खरे (वय-50) या महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शैलेश साबळे यांचे विरुद्ध गुन्हा क्रं.230/2024 भा.द.वि.कलम 452,354,379,323,504,506,427,143,149 सह अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध अधिनियम) 1989 व सुधारणा अधिनियम 2015 चे कलम 3(1)(डब्ल्यू)(आय)3(2)(व्ही)(1)(2)(आर)(एस)अनव्ये आरोपी सह शैलेश साबळे व इतर 7-8 इसम याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात फिर्यादी महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आपण घरी असताना आरोपीने राहते घरी येवुन त्यांचे घराचे दरवाजाचे लॉक तोडुन त्यांच्या परवानगी शिवाय घरामध्ये प्रवेश करून घरातील सामानाचे नुकसान करून,घरामधील सामांनाची उचक पाचक करून फीर्यादीचा मोबाईल व घराच्या कागदपत्रांची फाईल असे चोरून घेवुन गेले आहे. तेव्हा फिर्यादी त्यांना विरोध करत असताना त्यांनी फिर्यादी यांना धक्का बुक्की करून त्यांचा हात धरून त्यांना बाजुला लोटुन फिर्यादीच्या हाताला दुखापत केली व त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून आपला विनयभंग केला आहे.तसेच आरोपी शैलेश साबळे फिर्यादी यांने जातीवाचक उल्लेख करुन,तुम्हाला मी आज जिवंत सोडणार नाही तु आता मरशीलच पण तुझ्या नव-याला पण मी सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी देवुन जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचा गुन्हा शैलेश साबळे व त्याचे इतर साथीदारा विरूध्द दाखल केला आहे. दरम्यान या घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली आहे.

COMMENTS