Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यवतमाळमध्ये नगरसेवकाची हत्या

यवतमाळ/प्रतिनिधी ः यवतमाळमध्ये पैशाच्या वादातून नगरसेवकाची भर रस्त्यात धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ही घटना काल मध्यरात्रीदरम्यान घडली

दलित तरुणांचा अमानवीय छळ करणारा मुख्य आरोपी मोकाटच  
चोरट्यांनी घरफोडी करून 13 ते 15 तोळे केले लंपास
धनश्री शेतकरी मंडळाच्या मागण्यांची पूर्तता करू- डॉ.सचिन सानप

यवतमाळ/प्रतिनिधी ः यवतमाळमध्ये पैशाच्या वादातून नगरसेवकाची भर रस्त्यात धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ही घटना काल मध्यरात्रीदरम्यान घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत गावंडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिकेत गावंडे हे यवतमाळ येथील बाभूळगाव नगर पंचायत नगरसेवक होते. त्यांनी रेती व्यवसायात बाभूळगाव तालुक्यात पाय रोवले होते. यानंतर प्रहारकडून नगरपंचायत निवडणूक लढून निवडून आले. दरम्यान, काल मध्यरात्री त्यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. रेतीच्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन संशियितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. अनिकेत यांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्यांचा रेती व्यवसाय होता, याच व्यवसायातून त्यांनी भरपूर पैसा कमावला. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करून बाभूळगावात नगरपंचायत निवडणूक लढली. या निवडणुकीत त्याला यशही मिळाले. त्यामुळे त्याचे प्रतिस्पर्धीही वाढले होते. गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लावल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यात घडला आहे. गोंदियात एका शिक्षकांना तब्बल आठ विद्यार्थिनीसोबत अश्‍लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर त्याच्याविरुद्ध रावणवाडी पोलिसात बाललैंगिक अत्याचार अधिनियमन्वये गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS