Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने मध्यरात्री पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

लातूर प्रतिनिधी - आगामी सण उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद च्या अनुषंगाने सदरचे सण-उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडावे. गुन्हेगा

मतदान रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटविणार : महसूल मंत्री बावनकुळे
तुळजाभवानी मंदिरातील 200 किलो सोनं वितळवण्यास परवानगी

लातूर प्रतिनिधी – आगामी सण उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद च्या अनुषंगाने सदरचे सण-उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडावे. गुन्हेगारी कृत्य करणा-या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण लातूर जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार, दि. 11 ते 12 एप्रिल रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यत लातूर पोलिसाकडून संपूर्ण लातूर जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
या कोंबिंग ऑपरेशन मध्ये जिल्ह्यातील 28 अधिकारी व 124 पोलीस अंमलदारांचे अनेक पथके तयार करून मोठ्या प्रमाणावर, प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन राबविले. लातूर पोलिसांनी 105 लॉजेस व हॉटेलची तपासणी करण्यात आली असून न्यायालयाकडून काढण्यात आलेल्या व सतत पोलिसांना चकवा देणा-या 13 आरोपींना वॉरंट बजावणी करून अटक करण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यात विविध 25 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून 802 संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. 15 मर्मस्थळाची तपासणी करण्यात आली. पोलीस रेकॉर्ड वरील 59 सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून मालाविषयक गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वत:चे अस्तित्व लपवून दबा धरुन बसलेल्या 1 इसमाविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 (क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारु विक्री करणा-यावर 16 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोंबिंग ऑपरेशनच्या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्य करणा-यांचे धाबे दणाणले आहे.लातूर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमजानईद व इतर सण उत्सव साजरे करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मुंडे यांचे निर्देशान्वये अनेक पोलीस ठाणे हद्दीत ग्रामभेटीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या ग्राम भेटीमध्ये ठाणे प्रभारी अधिकारी व बीट अंमलदारांनी अनेक गावात बैठका घेऊन गावक-यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन आगामी सण उत्सव अतिशय उत्साही वातावरणात, निर्विघ्नपणे पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता प्रत्येक गावात पोलीस दलातर्फे रूट मार्च ही काढण्यात आले.

COMMENTS