Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीमती जयश्री सोनकवडेंसह तीन अधिकार्‍यांवर दखलपात्र गुन्हा दाखल

बहुजन हिताय भोजन पुरवठा संस्थेविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तक्रार

मुंबई/प्रतिनिधी ः मराठवाडा विभागातील जालना जिल्ह्यातील अंबड येथे मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात भोजन पुरवठाचा ठेका बहुजन हिताय भोजन उत्पादन व पु

श्रीमती जयश्री सोनकवडे यांना ‘त्या’ व्हिडिओप्रकरणी कायदेशीर नोटीस
खासदार लोखंडे भ्रष्टाचारात ‘अव्वल’ ; अनुदान लाटण्यात ‘पटाईत’
श्रीमती सोनकवडेंचा अधिकारी, कर्मचार्‍यांवर नोटीसींचा पाऊस

मुंबई/प्रतिनिधी ः मराठवाडा विभागातील जालना जिल्ह्यातील अंबड येथे मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात भोजन पुरवठाचा ठेका बहुजन हिताय भोजन उत्पादन व पुरवठा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, रमाई आंबेडकरनगर, परभणी या संस्थेला दिला होता. या संस्थेवर मुदतबाह्य बिस्किटांचा पुरवठा केल्याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल केला होता. षडयंत्र करून हा खोटा गुन्हा दाखल केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले असून, याप्रकरणी या भोजन पुरवठ्याचे ठेकेदार श्रीरंग नागोगराव हत्तीअंबीरे यांनी खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणार्‍या छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे, सहाय्यक आयुक्त  अमित घवले आणि गृहपाल किशोरी अलोग यांच्यावर विविध कलमान्वये आणि अ‍ॅट्रोसिटीच्या विविध कलमाखाली दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, श्रीरंग हत्तीअंबीरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद देत पोलिसांनी भादंवि संहिता कलम 420, 177, 499, 500, 34 आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा 1989 नुसार कलम 3 (1) 8,  3 (1)9, 3 (1)(झेडसी), 3(1)(टी ) 3(1) क्यू, या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, मी बहुजन हिताय भोजन उत्पादन व पुरवठा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, परभणी येथे चेअरमन आहे. तसेच मी मागासवर्गीय जातीचा आहे. 01 मे 2022 ते 30 एप्रिल 2023 च्या दरम्यान मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, अंबड येथे भोजन पुरवठा करण्याचे आदेश सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांच्याकडून मला आदेश क्र. 1653 दिनांक 11 जुलै 2019 नुसार देण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात एकुण 9 ठिकाणी या संस्थेमार्फत विविध वसतिगृहात भोजन पुरवठा केला जात होता. दिनांक 5 फेबु्रवारी 2023 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, जालना यांच्याकडून अंबड पोलिस स्टेशन येथे माझ्यावर आणि संस्थेवर व इतर लोकांवर खोटा गुन्हा क्र. 83/2023 रोजी नोंदविण्यात आला. तसेच सदर एफआयआरमध्ये असे नमूद केले आहे की, मी आणि संस्थेने अंबड येथील मुलींच्या वसतिगृहास मुदतबाह्य बिस्किटांचा पुरवठा केला व ही बिस्किटे आरोग्यास असुरक्षित होती. गुन्हा दाखल करतेवेळी प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग, औरंगाबाद येथील श्रीमती जयश्री सोनकवडे तसेच सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, जालन्याचे अमित घवले हे आणि गृहपाल किशोरी अलोग हे सर्वजण मुलींचे वसतिगृह अबंड येथे दिनांक 04 फेबु्रवारी 2023 रोजी हजर होते. श्रीमती जयश्री सोनकवडे, अमित घवले, किशोरी अलोने हे तिघेही अधिकारी गुन्हा दाखल होईपर्यंत, अन्न व सुरक्षा अधिकार्‍यांना खोटी माहिती देऊन घाईघाईत रात्री दिनांक 05 फेबु्रवारी 2023 रोजी सुमारे एकच्या दरम्यान खोटा गुन्हा संबंधीत अधिकार्‍यांमार्फत कट रचून षडयंत्र करुन, पूर्वनियोजन करुन दाखल केला.  गुन्हा दाखल करण्याच्या दिवशी हे तीनही लोक एकमेकांच्या निरंतर संपर्कात होते हे त्यांच्या मोबाईल सी.डी.आर. वरून लक्षात येईल तसेच त्यांचे मोबाइल लोकेशन सुद्धा अंबड परिसरातच होते हे स्पष्ट होईल.

याप्रकरणात तपासानंतर फिर्यादीमध्ये काही तथ्य नसल्यामुळे व सबळ पुरावा चेअरमन व संस्थेविरुद्ध नसल्यामुळे खोट्या माहितीच्या आधारावर जाणूनबुजून फिर्यादीस अंधारांत ठेवुन गुन्हा दाखल झाल्याचे आढळून आल्यामुळे संबंधीत तपास अधिकार्‍यांनी अंबड न्यायालयात सी-समरी रिपोर्ट दाखल केला. तसेच फिर्यादी नामे प्रशांत अजिंठेकर यांनी या प्रकरणात स्वतःचे शपथपत्र न्यायालयात दाखल करुन हे प्रकरण संपवण्यासाठी आणि फिर्याद रद्द करण्यासाठी परवानगी मागितली व या परवानगीला न्यायालयाने मंजुरी देवून हे प्रकरण सी. समरी क्रमांक 223/2023 नूसार रद्द केले आहे. या प्रकरणात बिस्किटाटासंबंधी प्राप्त झालेल्या अहवालावरुन हे बिस्कीट मुदतबाह्य नसून खाण्यास सुरक्षित असल्याचा अहवाल संबंधित कार्यालयाकडून पोलिसांना प्राप्त झाल्यामुळे संबंधित पोलिसांनी सर्व बाबींचा विचारक करून हे प्रकरण सी-समरी साठी न्यायालयात पाठविले होते. या प्रकरणात मुदतबाह्य बिस्कीटांबाबत जेवणात पुरवठा केला अशी तक्रार सुद्धा वसतिगृहातील विद्यार्थीनीमार्फत करण्यात आलेली नाही असे आढळले आहे. तसेच वसतिगृहातील मेनूमध्येच बिस्कीट नसल्याचे भोजन पुरवा करारानुसार आढळून आले आहे. त्यामुळे माझे व सर्व संस्थेचे खुप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करण्यात आले. माझी व संस्थेची प्रतिमा व प्रतिष्ठा पुर्णपणे मलीन करण्यात आली. विविध वृत्तपत्रात खोड्या व बदनामी करण्यात येणान्या बातम्या प्रकाशिल करण्यात आल्या. सोशल मीडियावर खोटे व्हिडीओ माझी व संस्थेची बदनामी करण्यासाठी व्हायरल करण्यात आले. सोशल मीडियावर बदनामी होईल अशा खोट्या पोस्ट माझ्या व संस्थेविरुद्ध करण्यात आल्या. अंबड येथील गुन्हा दाखल करण्यासाठी बर्‍याच राजकीय व शासकीय लोकांची मदत घेण्यात आली. अन्न व सुरक्षा अधिकान्यांती शासकीय सेवेत कार्यरत असताना सुद्धा शासकीय अधिकान्यांना खोटा गुन्हा घाईघाईत दाखल करण्यासाठी दिशाभूल करुन खोटी माहिती पुरविण्यात आली. या प्रकरणात पोलीस अधिकार्‍यांना तसेच अन्न व सुरक्षा अधिकार्‍यांना खोटी माहिती देवून त्यांची सुद्धा फसवणूक करण्यात आल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या अधिकार्‍यांना मी मागासवर्गीय असल्यामुळेच मला जाणूनबुजून त्रास देण्यात आला, तसेच माझे भोजन पुरवठा ठेके रद्द करण्यात अ ाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.  यामुळे मला प्रचंड मानसिक, सामाजिक व आर्थिक त्रास झाला आहे. हा संपुर्ण प्रकार जाणीवपूर्वक या तीनही लोकांनी इतर लोकांशी संगनमत करुन घडवुन आणली आहे. खुप मोठा कट व षडयंत्र रचुन एकमेकांशी संगनमत करून मला व संस्थेला मी मागासवर्गीय असल्यामुळे या सर्वांनी मला अपमानीत केले आहे. किशोरी अलोने, जयश्री सोनकवडे, अमित धवले, या तिघांणी मिळून शासकिय सेवेत असतांना, अन्य व सुरक्षा अधिकारी प्रशांत अंजिठेकर यांना अशी खोटी माहिती देवून माझ्यावर आणि संस्थेवर गुन्हे दाखल केल्याचे तक्रारी म्हटले आहे.

खोटा गुन्ह्यांद्वारे संस्थेचे भोजन पुरवठा रद्द करण्याचे षडयंत्र- संस्थेवर खोटे गुन्हे दाखल करून, प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे, अमित धवले, किशोरी अलोन लोकांचा दृष्ट हेतू असल्याचे न्यायालयाच्या निर्णयावरूनस्पष्ट झाले आहे. बहुजन हिताय भोजन पुरवठा संस्था परभणी, येथील दोन, औरंगाबाद येथील चार, जालना येथील दोन, आणि अंबड येथील एक, असे मराठवाड्यातील 9 ठिकाणचे भोजन पुरवठा करार माझे व विविध संस्थेचे रद्द करायचे होते. वरील तीनही लोकांनी व त्यांच्या सोबतच्या इतर लोकांनी संगनमताने माझी व संस्थेची प्रतिष्ठा समाजात व नातेवाईकांमध्ये मलीन करायची होती. जनसामान्य जनतेत व संपूर्ण मराठवाड्यात जाणूनबुजून माझी व संस्थेची बदनामी करायची होती, संस्थेचे आर्थिक नुकसान, मानसिक खच्चीकरण करायचे होते. भविष्यात मला आणि संस्थेला भोजन पुरवठा कराराचे काम मिळु द्यायचे यासाठी या लोकांनी षडयंत्र आखले होते. या सर्व गोष्टी. फेब्रुवारी 2023 ते जुलै 2023 दरम्यानच्या काळात या तीनही लोकांनी त्यांचा दृष्ट हेतू हा कट व संगनमत करून साध्य केला आहे. आणि त्याप्रमाणे मराठवाड्यातील एकुण 9 ठिकाणचे भोजनपुरवठा करार अंबड येथील दाखल खोट्या गुन्ह्याच्या आधारावर घाईघाईत रद्द करण्यात आले आणि सगळीकडे माझी व संस्थेची बदनामी करण्यात आली.

श्रीमती सोनकवडेंना खोटे गुन्हे दाखल करण्याची जुनी सवय – श्रीमती सोनकवडे यांना आपल्या प्रशासकीय कार्यकाळात आपल्या सहकारी अधिकार्‍यांवर, एका पोलिस उपनिरीक्षकावर, विविध संस्था, ठेकेदारांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे त्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याची सवयच लागली आहे. खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे अनेकांना मानसिक, आर्थिक त्रासांचा सामना करावा लागलेला आहे. मात्र कालांतराने खोटे गुन्हे सिद्ध होवू शकलेले नाहीत, हे देखील विशेष. 

COMMENTS