मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेना-भाजप सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अबु्रनुकसानीचा खटला दाखल केला आहे. मा

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेना-भाजप सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अबु्रनुकसानीचा खटला दाखल केला आहे. मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकार्यांच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. गिरणा सहकारी साखर कारखान्यात दादा भुसे यांनी यांनी 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता.
उद्धव ठाकरेंची मालेगावात जाहीर सभा झाली होती. यावेळी बोलतांना आपल्या भाषणातून संजय राऊत यांनी गिरणा साखर कारखान्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत भुसेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्रातूनही राऊत यांनी दादा भुसेंवर आरोप केला होता. त्यानंतर दादा भुसे यांनी हे आरोप सिद्ध करण्यासाठी संजय राऊतांना अवधी दिला होता. आता त्यांनी थेट कोर्टात धाव घेत संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. वृत्तपत्रातून चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
COMMENTS