Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी नगरमध्ये भावी पतीविरुद्ध गुन्हा दाखल 

अहमदनगर/प्रतिनिधी  घरात झोपलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस उठवून तिच्याशी अंगलट करून तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना

ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे : पालकमंत्री हसन मुश्रीफ
पैसे घेतले का विचारले म्हणून पत्नीसह जन्मदात्यांना मारहाण…
अ‍ॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयाची स्वच्छता मोहीम उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी  घरात झोपलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस उठवून तिच्याशी अंगलट करून तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शून्य नंबरने बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

  या बाबतची अधिक माहिती अशी कि पारनेर तालुक्यातील एका १६ वर्षीय मुलीच्या नातेवाकानी ती १८ वर्षाची झाल्यानंतर तिचे लग्न त्यांच्याच नात्यातील मुलाशी करू असा विचार केला असल्याने त्यांच्यात बोलाचाली व घरी येणे जाणे होत असे घरात कोणी नसताना ती मुलगी झोपलेली असताना त्यांच्याच नात्यातील त्या मुलीचा भावी पती असलेला मुलगा त्यांच्या घरात आला, आणि त्याने मुलीस झोपेतून उठवुन तिच्याशी अंगलट करू लागला. त्या मुलीने उठून असे काय करतोस असे म्हणून त्यास विरोध केला. त्यावर त्याने आपण लग्न करणारच आहोत ना असे म्हणून तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.त्या मुलीने त्यास विरोध केला असता त्याने बळजबरीने तिच्याशी शरीर संबंध केले. व या प्रकारची कोठेही वाच्यता करु नये म्हणून धमकी दिली.  

या  प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन भा द वि कलम ३७६ प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्यात शून्य नंबसरने गुन्ह्याची नोंद केली’ हा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.    

COMMENTS