Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शर्टचे बटण उघडे ठेवणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल

नांदेड ः काही तरुण आपण सगळ्यात हटके आणि रुबाबदार दिसावं म्हणून वेगवेगळी फॅशन करतात. भाईगीरी करणारे तरुण हमखास आपल्या शर्टची काही बटणे खुली ठेवतात

दूध दरवाढीसाठी कर्जत तहसीलसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन
अजित पवारांनी नगरला येऊन काय केले ? गडकरींनाच फोन केला ना ?
जिल्हा रुग्णालय आरोग्य प्रशासन धाकट्या पंढरीच्या दारी

नांदेड ः काही तरुण आपण सगळ्यात हटके आणि रुबाबदार दिसावं म्हणून वेगवेगळी फॅशन करतात. भाईगीरी करणारे तरुण हमखास आपल्या शर्टची काही बटणे खुली ठेवतात. आता अशीच शायनींग मारत भाईगिरी करणे चार तरुणांना महागात पडले आहे. लोहा पोलिस स्टेशनमध्ये अशा पध्दतीने जाणे चौघांना चांगलेच अंगलट आले आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी चौघेजण नांदेडच्या लोहा पोलीस ठाण्यात आले होते. पण पोलिस ठाण्यात आले त्यावेळी या चौघांच्या शर्टचे वरचे बटण उघडे होते. पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी ते पाहिले आणि चौघांना चांगली अद्दल घडवत गुन्हा दाखल केला.

COMMENTS