Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडत असतांना शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्या

मान्सूनची सलामी
विकसित भारत घडवण्याचा काळ – राष्ट्रपती मुर्मू
केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडत असतांना शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्‍वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले. मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. त्या आधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पूजा करून वंदन केले होते. हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.  वरिष्ठ अधिकार्‍यांनी या संदर्भातील घटनेची माहिती मागवली होती.

COMMENTS