Homeताज्या बातम्यादेश

’द वायर’ विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : कायम चर्चेत राहणार्‍या ’द वायर’ या न्यूज पोर्टल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्या तक्रार

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू
नवीन संसद आत्मनिर्भरतेची साक्ष बनेल – पंतप्रधान मोदी
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले स्कॉर्पियो थेट संरक्षक पट्टीला जाऊ धडकली.

नवी दिल्ली : कायम चर्चेत राहणार्‍या ’द वायर’ या न्यूज पोर्टल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्या तक्रारीवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मालविय यांनी ’द वायर’ विरुद्ध फौजदारी व दिवाणी कारवाईचा निर्णय घेतलाय. याप्रकरणी मालयवीय म्हणाले की, ’द वायर’ विरोधात केवळ फौजदारी प्रक्रिया सुरू करणार नाही तर त्यांच्यावर दिवाणी न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावाही करणार आहे. कारण त्यांनी माझी प्रतिष्ठा खराब आणि कलंकित करण्याच्या हेतूने बनावट कागदपत्रे तयार केली आहेत असे मालवीय यांनी सांगितले. मालविय यांच्या तक्रारीवर ’द वायर’चे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन, संस्थापक-संपादक सिद्धार्थ भाटिया, एमके वेणू आणि उपसंपादक तसेच कार्यकारी वृत्त निर्मात्या जान्हवी सेन यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर कलम 420, 468, 469, 471, 500 तसेच भादंवि 120 बी आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS