Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कत्तलीसाठी नेताना दुभत्या गायींची गाडी पलटी

पुसेगाव / वार्ताहर : डिस्कळ-चिंचणी मार्गावरील डिस्कळ (ता. खटाव) हद्दीत गोवंश तस्करी करणारे वाहन नाल्यात पलटी झाले. या अपघातामुळे प्रवासी वाहनातून कत्

विद्यार्थिनींना एसटीकडून शाळेतच पास वाटपाचे नियोजन
चेतना सिन्हा यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
मेडिकल कॉलेजची टेंडर प्रक्रिया महिनाअखेर होणार

पुसेगाव / वार्ताहर : डिस्कळ-चिंचणी मार्गावरील डिस्कळ (ता. खटाव) हद्दीत गोवंश तस्करी करणारे वाहन नाल्यात पलटी झाले. या अपघातामुळे प्रवासी वाहनातून कत्तलीसाठी अवैध गोवंश वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले. तसेच या अपघातामुळे का होईना; पण तीन दुभत्या गायींचे प्राण वाचले.
शुक्रवारी (ता. 12) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गायींना कतलीसाठी घेऊन जाणारी हे डिस्कळ गावच्या हद्दीतील डिस्कळ-चिंचणी रोडवरील गोडसे वस्ती येथील सयाजी बाबूराव गोडसे यांच्या गोठ्याजवळील नाल्यात चालकाचे नियंत्रण सुटून एका बाजूस पलटी झाली. बातमीदारामार्फत या घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली.
यावेळी प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या वाहनात एक देशी गाय, एक गीर जातीची गाय, एक जर्सी गाय अशा एकूण तीन गायी कमी जागेमध्ये निर्दयपणे कोंबून भरलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळल्या. तिन्ही गायींचे चारी पाय व तोंड रस्सीने बांधल्याने या गायी जखमी व अशक्त झाल्या होत्या. पोलिसांनी तातडीने स्थानिकांच्या मदतीने या गायींना बाहेर काढून प्राथमिक उपचार केले. कतलीसाठी नेण्यात येणार्‍या या गायी दुभत्या असल्याचे भयाण वास्तव यावेळी समोर आले.
दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन गायींनी भरलेले वाहन सोडून चालक पसार झाला होता. पोलिसांनी हे वाहन जप्त करून वाहनातील तिन्ही गायींच्या चारापाण्याची सोय पुसेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विलास घोरपडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आनंदा गंबरे करत आहेत.

COMMENTS