Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

55 प्रवाशांनी भरलेली बस बुलढाण्याच्या घाटात पलटली

बुलढाणा- मुसळधार पावसामुळे एकीकडे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भी

गरोदर महिलेच्या अंगावरून गेला उसाची ट्रैक्टर ट्रॉली
टेम्पो आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक; रस्त्यावर दारुच्या बाटल्यांचा खच
गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक

बुलढाणा- मुसळधार पावसामुळे एकीकडे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं. ही बस थेट राजूर घाटात पलटी झाली. बसमधून ५५ प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. या प्रवाशांमध्ये काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याचं कळतंय. अपघातात १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती कळत आहे. मलकापूर- बुलढाणा बसच्या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सध्या बाहेर काढण्यात येतंय. ब्रेक फेल झाल्यानेच हा अपघात झाल्याची माहिती सध्या कळत आहे. सुदैवानं अद्याप अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त आलेलं नाही. मलकापूर-बुलढाणा बस राजूर घाटात आल्यानंतर बसचे ब्रेक फेल झाले. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. मलकापूरहून बुलढाणाकडे ही बस निघाली होती. मोहेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. प्रवाशांना किरकोळ मार लागल्याचं वृत्त आहे. बस क्रमांक ८३७५ चा जॉईंटर निसटला आणि बस मागे मागे जाऊ लागली. दरम्यान ब्रेक दाबत असताना एसटी बस पलटी झाली, अशी प्राथमिक माहिती बुलढाणा आगाराकडून माहीती मिळाली आहे. बस मध्ये ५५ प्रवासी असल्याचे कळते.

COMMENTS