अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे रोडवरील कायनेटिक चौकाजवळील रेल्वे ब्रीज लगत असलेल्या प्रियंका कॉलनी येथे राहणारे नाशिक कारागृहाचे जेलर चंद्रकांत कचरू जठ
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे रोडवरील कायनेटिक चौकाजवळील रेल्वे ब्रीज लगत असलेल्या प्रियंका कॉलनी येथे राहणारे नाशिक कारागृहाचे जेलर चंद्रकांत कचरू जठार हेे त्यांच्या नातेवाईकांना उपचाराकरिता पुणे येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता कुणीतरी अज्ञात चोराने त्यांच्या घराच्या हॉलचा दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून आत प्रवेश केला व कपाटाचे लॉक उघडून सोन्याची अंगठी चोरून नेली.
जठार नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात जेलर म्हणून मागील चार वर्षापासून कार्यरत असून आठ दिवसातून एकदा ते कायनेटीक चौक (नगर) येथील घरी येत असतात. त्यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान, जठार यांच्या घरी चोरी केल्यावर चोरट्यांनी त्यांच्या कॉम्प्लेक्समधील श्रीराम कुराडे यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला व कपाटातील लॉकर तोडून 10 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व रोख रक्कम 2 हजार 800 तसेच 20 हजार रुपये किमतीची नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा बत्तीस हजार आठशे रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला.
COMMENTS