Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेकनूरच्या बाजारात बैल उधळला

नेकनुर प्रतिनिधी - नेकनूरला जनावरांचा मोठा आठवडी बाजार भरतो. आज विक्रीसाठी आणलेला एक बैल अचानकपणे बाजारात उधळल्याने एकच धावपळ झाली. या बैलाने काह

नोकरीचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार .
डोंबिवलीत सावरकर गौरव यात्रेचे आयोजन
अर्णबला अटक करण्यापूर्वी नोटीस द्या ; उच्च न्यायलयाचे आदेश

नेकनुर प्रतिनिधी – नेकनूरला जनावरांचा मोठा आठवडी बाजार भरतो. आज विक्रीसाठी आणलेला एक बैल अचानकपणे बाजारात उधळल्याने एकच धावपळ झाली. या बैलाने काही दुचाकीस्वारांसह पायी जाणार्या नागरिकांना चेंगरले असून यात सात ते आठ जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले. अर्धा ते पाऊन तासानंतर बैलाला पकडण्यात आले.
नेकनूरच्या आठवडी बाजारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. हा बाजार मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. आज विक्रीसाठी आलेला एक बैल अचानकपणे बाजारात उधळला. नुरानी चौक ते बीड रोडवर हा बैल पळत सुटल्याने नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली होती. या बैलाने मोटारसायकलस्वारांसह पायी जाणार्या नागरिकांना चेंगरले. यात सात ते आठ जण जखमी झाले. अर्धा ते पाऊन तासानंतर हा बैल पकडण्यात आला.

COMMENTS