Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’संतश्री’ पुस्तक म्हणजे संतवृत्तीचा शब्दसंस्कार : डॉ.बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर : ग्रंथ हे गुरू आहेत, वाचन ही तपश्‍चर्या आहे,ती एक ज्ञानगंगा आहे. या गंगेच्या काठावरचे ’संतश्री’ पुस्तक म्हणजे संतवृत्तीचा शब्दसंस्कार

सुरेश गुड्डे यांनी ’गुरुजी’ या शब्दाची प्रतिष्ठा निर्माण केली ः सुखदेव सुकळे
भास्कर वाव्हळ यांचे निधन
डॉ. शिवाजी काळे यांच्या ’देवाची करणी’ कथेस अक्षरवैदर्भी कथा पुरस्कार

श्रीरामपूर : ग्रंथ हे गुरू आहेत, वाचन ही तपश्‍चर्या आहे,ती एक ज्ञानगंगा आहे. या गंगेच्या काठावरचे ’संतश्री’ पुस्तक म्हणजे संतवृत्तीचा शब्दसंस्कार होय, असे मत वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील ग्रंथा वाचनालयातर्फे भानसहिवरे येथील कुंभार समाजाचे कार्यकर्त भाऊसाहेब देवतरसे व परिवारास ’संतश्री’ पुस्तके भेट देताना डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. याप्रसंगी भारतीय आर्मीतील सेवानिवृत्त मेजर नंदकुमार सैंदोरे यांची सी.आर.पी.एफ.सब इन्स्पेक्टरपदी प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाल्याबद्दल भाऊसाहेब देवतरसे व परिवाराने त्यांचा सन्मान केला. तसेच डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा ’माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ हा ग्रामीण कथासंग्रह मॉरिशस देशातील संशोधन प्रकल्पात समाविष्ट झाल्याबद्दलही त्यांचाही सत्कार करण्यात आला, ग्रामीण भागात वाचन संस्कृती आणि ग्रंथप्रेम जपणारे भाऊसाहेब देवतरसे यांचा गौरव करून त्यांना संतश्री व विविध पुस्तके भेट देण्यात आली. याप्रसंगी श्रीमती लक्ष्मीबाई उपाध्ये, कुंदा विलासराव तुळे, मंदाकिनी उपाध्ये, गंगाराम सोमवंशी आणि देवतरसे परिवार उपस्थित होते. भाऊसाहेब देवतरसे म्हणाले, ग्रामीण भागात वाचकवर्ग भरपूर आहेत परंतु पुस्तके फारसे उपलब्ध होत नाहीत, डॉ. उपाध्ये व काही साहित्यिक पुस्तके देतात, ती अनेक वाचक वाचतात, त्यातूनच ग्रामीण वाचन संस्कृती वाढत असल्याचे सांगून त्यांनी मेजर सैंदोरे व डॉ. उपाध्ये यांचे आभिनंदन करून आभार मानले.

COMMENTS