भंडारा प्रतिनिधी - दोन दिवसांपूर्वी पुण्याजवळील राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला होता. यात 30 ते 35 जणांन

भंडारा प्रतिनिधी – दोन दिवसांपूर्वी पुण्याजवळील राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला होता. यात 30 ते 35 जणांना मधमाशांनी चावा घेतला. यापैकी तिन पर्यटक बेशुद्ध अवस्थेत होते. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. स्मशानभूमीत मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरीकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने नागरीकांची एकच तारांबळ उडाली. सगळे सैरावैरा धावत सुटले. एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेचे व्हिडीओ चित्रण केलं आहे. मोहाडी तालुक्यात येत असलेल्या हरदोली/झंझाळ येथे ही घटना घडली. अंत्यसंस्कार सोडून लोक घरी गावातील मारोती कबल गायधणे (वय 69) यांचा मृत्यू झाल्याने आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांसह गावातील नागरिक अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जमले होते. मृतदेहाला अग्निडाग देताच येथून निघालेला धूर वर झाडावर बसलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यापर्यंत पोहचला. यामुळे मधमाशा उडाल्या आणि त्यांनी नागरीकांवर हल्ला केला. अचानक गोंधळ उडाला. लोक वाट सापडेल तिकडे धावू लागले. चक्क अंत्यसंस्कार सुरू असताना लोकांनी कार्यक्रम सोडून घर गाठलं. या घटनेचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. भंडारा जिल्ह्यातील हरदोली येथील स्मशानभूमीत हा प्रकार घडला आहे. सदर ठिकाणी चिंचव्हाचे झाड असून आग्या मोहोळ या झाडावर बसले होते. सरणाचा धूर लागल्याने मधमांशानी हल्ला चढवला. त्यामुळे मधमाश्यांच्या हल्यापासून बचाव करण्यासाठी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरीकांनी सुसाट पळ काढला. ही भंडारा जिल्ह्यातील तीसरी घटना आहे.
COMMENTS