Homeताज्या बातम्याअहमदनगर

96 वर्षीय वयोवृद्ध महिलेने बजावला मतदानाचा हक्क

शहरटाकळी : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील अंजनाबाई मारुती वाघ वय 96 वर्षे या वयोवृद्ध महिलेने लोकशाहीच्या उत्साहात मोठ्या हिरारीने भाग घेत शहर

मोठा खुलासा ! पुरुषांच्या शुक्राणूची गुणवत्ता ढासळत आहे Superfast 24 | Lok News24
आमदार शिंदेंसाठी मी बेरर चेक ः फडणवीस
जिल्हा लोकल रिट कोर्ट सत्याग्रह जारी

शहरटाकळी : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील अंजनाबाई मारुती वाघ वय 96 वर्षे या वयोवृद्ध महिलेने लोकशाहीच्या उत्साहात मोठ्या हिरारीने भाग घेत शहरटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर येऊन स्वतः मतदान केले, लोकशाहीच्या या उत्साहात अनेक तरुण मंडळी मतदान करण्यास जात नाहीत, मात्र अंजनाबाई वाघ यांनी 96 व्या वर्षी देखील स्वतः मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला व तरुण पिढी व समाजापुढे एक आदर्श निर्माण केला, यावेळी निवडणूक अधिकार्‍यासह उपस्थित सर्वांनीच वयोवृद्ध अंजनाबाई वाघ यांचे कौतुक केले.

COMMENTS