Homeताज्या बातम्याविदेश

तब्बल 48 हजार वर्षांपूर्वीचा झोम्बी विषाणू सापडला रशियात

मास्को वृत्तसंस्था - वैज्ञानिकांकडून नेहमीच नव-नवीन शोध लावले जात असून, मानवाची उत्पत्ती आणि पृथ्वीची निर्मिती कशी झाली, याचे गूढ विविध सिद्धांत

आमदार काळेंच्या पुढाकारातून कोपरगावची बाजारपेठ फुलणार
जनसामान्यांचा विकास हेच माझे ध्येय ः आमदार मोनिकाताई राजळे
मुन्नाभाई डॉक्टरकडून अवैध गर्भपात

मास्को वृत्तसंस्था – वैज्ञानिकांकडून नेहमीच नव-नवीन शोध लावले जात असून, मानवाची उत्पत्ती आणि पृथ्वीची निर्मिती कशी झाली, याचे गूढ विविध सिद्धांतापासून उलगडण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करतांना दिसून येत आहे. अशाच एका संशोधनात फ्रेंच वैज्ञानिकांना तब्बल 48 हजार वर्षांपूर्वीचा झोम्बी विषाणू सापडला आहे. रशियामधील एका गोठलेल्या तळ्यामध्ये हा विषाणू सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. या विषाणूमुळे पुन्हा एकदा कोरोनापेक्षाही अधिक भयंकर आणि मोठी साथ पसरण्याची भीतीही या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
हा पुरातन विषाणू सापडल्याने भविष्यात वनस्पती, प्राणी आणि मानवासाठी परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असे या ‘व्हायरल’ माहितीमध्ये म्हटले आहे. प्राथमिक अहवालांनुसार वातावरण बदलांमुळे बर्फाच्या खाली असलेली उत्तर गोलार्धामधील अनेक ठिकाणी पहिल्यांदाच मानवाला संशोधनानिमित्त पोहोचता आले आहे. पहिल्यांदाच या गोठलेल्या अवस्थेत असलेल्या विषाणूंशी मानवाशी संबंध आला आहे. मात्र वातावरण बदलांमुळे ‘मागील हजारो वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेल्या या विषाणूंच्या माध्यमातून काही जैविक पदार्थांचं उत्सर्जन होण्याची शक्यता आहे,’ असा अंदाज व्यक्त केला जातोय. यामध्ये प्राणघातक विषाणूंचाही समावेश असू शकतो. या जैविक घटकांमध्ये पेशी असलेले अतिसूक्ष्म जीव तसेच विषाणूंचा समावेश असू शकतो, असाही संशोधकांचा अंदाज आहे. वैज्ञानिकांना हे झॉम्बी विषाणू सैबेरियन पठारावरील बर्फाच्या चादरीखालील गोठलेल्या तळ्यामध्ये आढळले. साथीचे रोग पसरण्यासाठी कारणीभूत असलेल्या आणि आतापर्यंत ठाऊक असलेला हा विषाणू 48 हजार 500 वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज आहे. अनेकांना बाधित करणारा हा विषाणू संसर्गाच्या लाटेदरम्यान या बर्फाच्या चादरी खाली हजारो वर्षांपासून दाबला गेला. हा आता सध्या मानवाला ठाऊक असलेल्या सर्वात जुन्या विषाणूंपैकी एक ठरला आहे. यापूर्वी 2013 मध्ये सैबिरियातच 30 हजार वर्षांपूर्वीच्या विषाणूचा शोध लागला होता.
या संशोधनादरम्यान 13 वेगवेगळ्या विषाणूंचा शोध लागला असून प्रत्येकाची रचना ही वेगवेगळी आहे. रशियामधील याकुतिया येथील युकेची आल्स नावाच्या तळ्यामध्ये यापैकी मुख्य विषाणूचा शोध लागला आहे. बर्फाखाली गोठलेल्या अवस्थेत असलेल्या सैबेरियन कोल्ह्याच्या केसांमधून तसेच आतड्यांमधून इतर विषाणूंचे अवशेष वैज्ञानिकांना मिळाले आहेत. हे काही हजार दशकांपूर्वीचे विषाणू संसर्गास कारणीभूत ठरु शकतात. त्यामुळेच ते मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. कोरोनासारख्या विषाणूंच्या संसर्गाच्या लाटा यापुढे सामान्यपणे अनेकदा येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या विषाणूंच्या माध्यमातून उत्सर्जित होणार्‍या पदार्थांमुळे बर्फ वेगाने वितळतो आणि त्याचं रुपांतर कार्बन डायऑक्साइड, मिथेनमध्ये होते. त्यामुळे हरितवायूचे अधिक प्रमाणात उत्सर्जन होते असेही वैज्ञानिकांनी म्हटले आहे. 

COMMENTS