Homeताज्या बातम्यादेश

13 वर्षीय मुलीची चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या

उत्तरप्रदेश प्रतिनिधी - उत्तर प्रदेशातील मथुरा येथून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका किशोरवयीन मुलीला शाळा सोडल्याबद्दल तिच्या

प्रियकराने कर्ज न फेडल्याने प्रेयसीची आत्महत्या
हॉटेल एक्सप्रेस इन इथल्या कर्मचाऱ्याची आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या
व्हाट्सअँप ला स्टेटस ठेवून शिक्षकाची आत्महत्या

उत्तरप्रदेश प्रतिनिधी – उत्तर प्रदेशातील मथुरा येथून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका किशोरवयीन मुलीला शाळा सोडल्याबद्दल तिच्या आईने फटकारल्यामुळे मुलीने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुशी शर्मा असं या मुलीच नाव होतं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय खुशी शर्मा बुधवारी शाळेत जाण्यास तयार नव्हती. यामुळे संतापलेल्या तिच्या आईने मुलीला शाळेत जाण्याचा हट्ट धरल्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर खुशीने शाळेत जाण्याऐवजी अलवर-मथुरा रेल्वे ट्रॅकवर जाऊन ट्रेनसमोर उडी मारली. या घटनेचे साक्षीदार असलेल्या स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. खुशीचे वडील रामवीर यांनी सांगितले की, तिचा भाऊ बारावीच्या वर्गात शिकत आहे. तसेच तिची धाकटी बहीण 8 वीच्या वर्गात शिकत आहे. असं म्हटलं जात आहे की, आईच्या वारंवार टोमण्यांमुळे मुलगी नाराज होती.

COMMENTS