कोपरगाव प्रतिनिधी - पतंग उडविताना जीवनाची दोरच कापली गेल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव येथे घडली आहे. तुटलेला पतंग पकडण्यासाठी धावताना धाप लागल्य
कोपरगाव प्रतिनिधी – पतंग उडविताना जीवनाची दोरच कापली गेल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव येथे घडली आहे. तुटलेला पतंग पकडण्यासाठी धावताना धाप लागल्याने श्वास बंद झाला. यामुळे सातवीत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे.या घटनेने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषदच्या शाळेत सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या साहिल गांगुर्डे या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आठवडा बाजार असल्याने आई- वडिलांनी साहिलसाठी मिठाई आणली होती. शाळा सुटल्यानंतर साहिल नेहमीप्रमाणे घरी आला आणि त्याने मिठाई खाल्ली. त्याचवेळी घराशेजारीच पतंग उडवणाऱ्या मुलांचा पतंग कट झाल्याने तो पतंग पकडण्यासाठी साहिल जोरात धावला. तुटलेला पतंग त्याने पकडला मात्र खूप जोरात धावल्याने त्याला धाप लागली आणि तो अत्यव्यस्त झाला. वडील भाऊसाहेब गांगुर्डे आणि आई सोनाली गांगुर्डे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी तातडीने त्याला गावातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच स्थानिक डॉक्टरांनी त्याला कोपरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. अतिशय जोरात धावल्याने त्याचा श्वासोश्वास बंद झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिवसभर शाळेत बागडणाऱ्या मुलाचा असा करून अंत झाल्याने गांगुर्डे कुटुंबीयांसह सोनेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
COMMENTS