Homeताज्या बातम्यादेश

राष्ट्रगीत म्हणत असताना दहावीच्या मुलीला आला हृदयविकाराचा झटका

उपचारादरम्यान झाला मृत्यू

कर्नाटक प्रतिनिधी - शाळेत राष्ट्रगीत सुरु असतानाच विद्यार्थिनीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या चा

नववीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
चालकाचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू.
गदर-2 पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

कर्नाटक प्रतिनिधी – शाळेत राष्ट्रगीत सुरु असतानाच विद्यार्थिनीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये ही घटना घडली आहे. शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना तत्काळ विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांना तिला मृत घोषित केलंपेलिशा असं १६ वर्षीय मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. विद्यार्थिनी या शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, दररोजप्रमाणे बुधवारी सकाळी शाळेतील सर्व मुले राष्ट्रगीत म्हणत होती. यादरम्यान विद्यार्थ्याची प्रकृती खालावलीसुरुवातीला शाळेतील शिक्षकांना वाटले की तिला चक्कर आली आहे. मात्र पेलिशाची तब्येत आणखी बिघडू लागली. यानंतर शिक्षकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी विद्यार्थिनीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाविद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला असावा, असं डॉक्टरांना म्हटलं. पेलिशा अनाथ असल्याने शाळेच्या वसतिगृहातच ती राहत होती. या घटनेने शाळेतील शिक्षक व मुलांना मोठा धक्का बसला आहे. शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पेलिशा हुशार आणि मेहनती मुलगी होती. ती आता या जगात नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

COMMENTS