Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि.प. : सुपर ५० उपक्रमातील ७ विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण

आयआयटी, एनआयटी, ट्रिपलआयटीत जाण्याचे स्वप्न होणार पूर्ण

नाशिक: नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२२ मध्ये सुपर ५० हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत सन २०२२ ते २०२४ या शैक्

भूक आणि महासत्ता!
..आणि, भिल्ल वस्तीत तब्बल 50 वर्षांनी आले हक्काचे पाणी
ड्रग नेक्सस उघडणार होते पण… मलिकांना नियती माफ करणार नाही.. राणे भडकले…

नाशिक: नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२२ मध्ये सुपर ५० हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत सन २०२२ ते २०२४ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना जेईई,  सीईटी व जेईई ॲडव्हान्स परीक्षांचे परीक्षांसाठी निवासच स्वरूपाचे प्रशिक्षण हे देण्यात आले. सलग दोन वर्षाच्या निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमानंतर ५० विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होऊन सदर विद्यार्थ्यांनी दि. २६ मे रोजी जेईई ऍडव्हान्स परीक्षा दिली होती. यापैकी ७ विद्यार्थी हे जेईई ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्याचे ना. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्हिडिओ कॉलवरुन संवाद साधत या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना मार्गदर्शन केले.

सुपर ५० उपक्रम २०२२ च्या बॅचची नुकतीच सांगता झाली या बॅचमधील २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होत जेईई ऍडव्हान्स परीक्षा दिली होती. यातील अश्विनी सुभाष बोरसे (AIR ९६८), डिंपल अशोक बागूल (AIR  १०१०), हर्षदा संजय वाटणे(AIR २२६३), आकांक्षा विनोद शेजवळ(AIR २९९३), मंगेश कृष्णा इंपाळ(AIR ३०४२), सागर मनोहर जाधव(AIR ३०४७), वृषाली जनार्दन वाघमारे (AIR ६१८९)  या विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांचे आयआयटी, एनआयटी, ट्रिपलआयटीत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. पुढील काळात एडमिशनसाठी ऑप्शन फॉर्म कसे भरावे यासाठी विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यात येणार असल्याचे सांगत पुढील ४ वर्ष कशा प्रकारे अभ्यास करावा याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपले अनुभव कथन केले, यामध्ये विद्यार्थिनी अश्विनी बोरसे हिने सुपर ५० उपक्रमातील उत्कृष्ठ मार्गदर्शनामुळे आम्हाला अभ्यासाला निश्चित दिशा मिळाली त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुद्धा वेळोवेळी आमच्या अभ्यासाबद्दल माहिती घेत आम्हाला मार्गदर्शन केले, आम्ही जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी टेस्ट सिरिज उपलब्ध करून दिली याबद्दल आभार मानले. डिंपल बागूल या विद्यार्थिनीने अनुभव कथन करतांना उपस्थिती २०२३ बॅचच्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स व जेईई ऍडव्हान्स परीक्षेची तयारी करावी याबद्दल माहिती दिली परीक्षांची भीती न बाळगता नियोजन करून अभ्यास करावा, अभ्यास करतांना येणारे प्रश्न शिक्षकांना त्याचवेळी विचारावे आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर कराव्यात, सुपर ५० उपक्रमामुळे मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आम्ही इतके मोठे यश संपादन करू शकलो असे म्हणत प्रशासनाचे आभार मानले. यावेळी गट विकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, गट शिक्षणाधिकारी डॉ.मिता चौधरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS