निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

Homeताज्या बातम्यादेश

निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

चांदीपूर : सुमारे एक हजार किलोमीटरपर्यंतची अचूक मारक क्षमता असलेल्या निर्भय क्षेपणास्त्राची आज बुधवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडी

‘बा विठ्ठला… राज्यात सुख व समृद्धी नांदू दे : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
भविष्यातील तंत्रज्ञान लीडर्स बनण्यासाठी कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यास उत्सुक 
सत्र न्यायालयातही डॉ. भास्कर मोरेचा जामीन फेटाळला

चांदीपूर : सुमारे एक हजार किलोमीटरपर्यंतची अचूक मारक क्षमता असलेल्या निर्भय क्षेपणास्त्राची आज बुधवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओने यशस्वी चाचणी केली. विशेष म्हणजे, या चाचणीसाठी स्वदेशी इंजीनचा वापर करण्यात आला. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी अपयशी ठरली होती. आज सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी ओडिशाच्या चांदीपूरच्या प्रक्षेपण केंद्रावरून निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी 100 किलोमीटर अंतरावर लक्ष्य निर्धारित करण्यात आले. लक्ष्यापर्यंत पोहोचून अचूक वेध घेण्यासाठी क्षेपणास्त्राला 15 मिनिटे लागली. आता लवकरच एक हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्याची चाचणी घेणार असल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱ्याने सांगितले. मागील वर्षी ऑक्टोबरमधील चाचणी अपयशी ठरल्यानंतर ही चाचणी प्रायोगिक तत्त्वावर होती. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या इंजीनची देखील या अनुषंगाने चाचणी घेण्यात आली. दोन्ही चाचण्या यशस्वी राहिल्याने आता आम्ही या क्षेपणास्त्राची परिपूर्ण चाचणी घेणार आहोत, असे अधिकार्याने स्पष्ट केले.निर्भय हे सबसोनिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र 0.7 ते 0.9 मॅक या वेगाने झेपावते. समुद्रात आणि पर्वतीय भागांमध्येही अचूक मारा करण्याची त्याची क्षमता असून, कोणत्याही वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. शिवाय, शत्रूंच्या रडारला चकमा देण्यासाठी त्याच्यात विशेष यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचा मारा करण्याचा टप्पा एक हजार किमीचा असला, तरी 1500 किमीपर्यंत मारा करण्याची त्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र आता भारतीय सैन्याकडे सोपविण्यात येणार असून, लवकरच सैन्याकडून या क्षेपणास्त्राच्या तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याचा सैन्यात समावेश करण्यात येईल. लष्करी स्तरावर तिन्ही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर हे क्षेपणास्त्र चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात येणार आहे.

COMMENTS