Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदाची लॉटरी

पुण्यात भाजप ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात

पुणे ः लोकसभा निवडणुकीत भाजपची सपाटून हार झाल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या दिशेने पावले उचलण्याचे मंत्रिमंडळाच्या विस्तारातून

पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात.
रस्ते अपघातात 12 टक्क्यांनी वाढ
मायलेकीचा प्रवास अखेरचा ठरला; हायवेवर आयशर टेम्पो-कंटनेरला भीषण अपघात

पुणे ः लोकसभा निवडणुकीत भाजपची सपाटून हार झाल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या दिशेने पावले उचलण्याचे मंत्रिमंडळाच्या विस्तारातून दिसून येत आहे. प्रथमच खासदार म्हणून निवडून आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना थेट केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. रविवारी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे पुणे जिल्ह्यात भाजप आपली ताकद वाढवण्याच्या विचारात असून, हा अप्रत्यक्षपणे अजित पवारांना शह असल्याचे दिसून येत आहे.
अजित पवारांच्या पक्षाला मंत्रिपद देण्याचे टाळत पुण्यात असलेले अजितदादांच्या प्रस्थाला शह देण्यासाठी आणि भाजपचे संघटन आणखी बळकट करण्यासाठी ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. पुणे लोकसभा मतदार संघातील 4 विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली असताना मुरलीधर मोहोळ यांचा अखेरच्या क्षणी विजय झाला. त्यामुळे भाजप पुण्यातून सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी मोहोळ यांना ताकद देण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जादू करणारे रवींद्र धंगेकर यांची जादू यंदा लोकसभेत काही चालली नाही. पुणे लोकसभा मतदार संघात तिरंगी लढतीत काँग्रेस आणि भाजपच्या या लढतीत वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांना जनतेने काही तारले नाही. तर भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी जवळपास 88 हजार मतांनी विजय मिळवला. पुणे लोकसभा मतदार संघातील 4 विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली असताना मुरलीधर मोहोळ यांचा अखेरच्या क्षणी विजय झाला.

COMMENTS