Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिंगार परीसरात घरफोडी; दागिन्यासह व रोकड लंपास

अहमदनगर : घराला कुलूप लावून कुटुंबासह गावी सुट्टीवर गेलेल्या लष्करी जवानाचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिन्यांसह ४९ हज

वेगात वाहने चालवणार्‍या दोघांना दणका, गुन्हे दाखल
मांडओहळ धरण सलग तिसऱ्या वर्षी ‘ओव्हर फ्लो’
खोदकामात सापडला 1098 कॅरेट मोठा हिरा LokNews24

अहमदनगर : घराला कुलूप लावून कुटुंबासह गावी सुट्टीवर गेलेल्या लष्करी जवानाचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिन्यांसह ४९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना जामखेड रोड वर यु ब्लॉक येथे घडली आहे.  याबाबतची माहिती अशी की दिनेश ओझा (वय ४५) हे भारतीय सैन्य दलात सेवेत आहेत. त्यांना वार्षिक सुट्टी असल्याने ते १३ मे रोजी पत्नी समवेत वार्षिक सुट्टी साठी त्यांच्या मूळ गावी गेले होते. सुट्टीवरुन ते पुन्हा नगरला परतले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी १३ मे ते ३१ मे या कालावधीत त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरात सर्वत्र उचकापाचक केली. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ४९ हजारांचा ऐवज चोरून नेला. असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरुन भिंगार कॅम्प पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS