Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील 3 केंद्रीय मंत्र्यांचा पराभव

मुंबई ः राज्यातील लोकसभेच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात विशेष करून भाजप-शिंदे गटाला जोरदार झटका बसला आहे. यात विशेष करून राज्यातील तीन क

जळगाव : लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा | LokNews24*
बाळासाहेबांची शिवसेनेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी देवेंद्र लांबे
Ahmednagar : दुकान बंद करण्यास सांगणाऱ्या मुख्याधिकाऱ्याला धक्काबुक्की | LOKNews24

मुंबई ः राज्यातील लोकसभेच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात विशेष करून भाजप-शिंदे गटाला जोरदार झटका बसला आहे. यात विशेष करून राज्यातील तीन केंद्रीय मंत्र्यांचा देखील दारूण पराभव झालेला आहे. यात जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेव दानवे पराभूत झाले आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचा विजय झाला आहे.
दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा भास्कर भगरे यांनी पराभव केला. भगरे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. दुसरीकडे केंद्रीय मंत्री असलेले भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांचा देखील पराभव झाला. त्यांचा शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांनी पराभव केला. गेल्या 20 वर्षांपासून दानवे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर त्यापूर्वी ते आमदार देखील होते. यावेळी कल्याणराव यांच्या रुपात त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले होते. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे जालन्यातील राजकारण चांगलेच बदलले. त्यामुळे यावेळी नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र येथे कल्याणराव काळे यांनी विजयी कामगिरी केली आहे. काळे यांनी दानवे यांचा 65 हजार मतांच्या फरकाने विजय झाला आहे. तर मंगेश साबळे या अपक्ष उमेदवाराने देखील लाखभर मतदान घेतल्याने दानवे यांच्या पराभवाचे ते प्रमुख कारण मानले जात आहेत.

COMMENTS