Homeताज्या बातम्यादेश

मोदींची तिसरी इनिंग नितीश-नायडूंवर अवलंबून

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देखील कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजप बहुमताच्या जवळ पोहोचले असले तरी, त

नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर
पवारांच्या पायाला दुखापत झाल्याने गाड्या रेस ट्रॅकवर
पैसे दाम दुप्पट करण्याचें आमिष दाखवून व्यावसायिकाची दहा लाख रुपयांची फसवणूक

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देखील कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजप बहुमताच्या जवळ पोहोचले असले तरी, त्यांना जवळपास 30 जागा कमी पडतांना दिसून येत आहे. तर इंडिया आघाडी सध्या 230 जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत एनडीए तिसर्‍यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पण 2014 आणि 2019 च्या निवडणूक निकालांप्रमाणे, यावेळी भाजपला पूर्ण बहुमताचा जादूई आकडा गाठता आला नाही. अशा स्थितीत भाजपला मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी एनफॅक्टर महत्त्वाचा बनला होता. तेव्हा विरोधी आघाडीने लक्ष न देता त्या एन फॅक्टरकडे पाठ फिरवली. आज तोच एन फॅक्टर किंगमेकर म्हणून समोर आला आहे. पण सध्या तो एनडीएच्या बाजूने आहे. हा एन फॅक्टर म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू. हे दोन्ही नेते इंडिया आघाडीचे मजबूत आधारस्तंभ होते पण इंडिया आघाडीतील ताण-तणावानंतर दोघांनीही युती सोडली आणि आपला लक्ष एनडीएकडे वळवले. एनडीएच्या नमोसाठी हा एन फॅक्टर नितीश आणि नायडू आहे. एनडीएने नमो म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर बाजी मारली आहे आणि या चेहर्‍याच्या जोरावरच त्यांना विजयाची आशा आहे. एनडीएला 299 जागा मिळताना दिसत असले तरी भाजप बहुमतात मागे पडल्याचे दिसत आहे. यावेळी एनडीए आणि नमो यांना बहुमतासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. नितीश आणि नायडू यांच्या भूमिकेनुसार नमो सरकार बनले जाईल. सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर नितीश यांच्या जेडीयूला बिहारमध्ये 40 पैकी 14 जागा आणि नायडूंच्या तेलगू देसम पक्षाला आंध्र प्रदेशात 16 जागा मिळताना दिसत आहेत. एनडीएसाठी आणि नरेंद्र मोदींच्या सरकारसाठीही या जागा महत्त्वाच्या आहेत. नितीश आणि नायडू यांनी मिळविलेल्या 30 जागा वजा केल्यास चा आकडा 265 वर येतो, जो बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 272 च्या जादुई आकड्यापेक्षा कमी आहे. हे पाहता एकेकाळी नितीश आणि नायडूंकडे पाठ फिरवणारा विरोधी पक्ष इंडिया आघाडीही त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा स्थितीत इंडिया आघाडी नितीश कुमार यांना मोठी ऑफर देऊ शकते, अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये नितीश सर्वांचे आहेत अशी पोस्टर्सदेखील लावली आहेत. नितीश कुमार यांची भूमिका काय असेल हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS