Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षणातून गावाचे नाव मोठे करा ः ज्ञानेश्‍वर परजणे

कोपरगाव तालुका ः शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनांतुन महत्वाचा घटक असुन मुला-मुलींनी ते आत्मसात करून गावाचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन सहकारमहर्षी

आंदोलनाचा इशारा देताच वीजपुरवठा सुरळीत
कर्जतच्या सदगुरु कन्या विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार
आमच्या जीविताशी खेळू नका… शिक्षक परिषद व शिक्षक संघाची सरकारला आर्त विनवणी, आधी लसीकरण करण्याची मागणी

कोपरगाव तालुका ः शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनांतुन महत्वाचा घटक असुन मुला-मुलींनी ते आत्मसात करून गावाचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्‍वर परजणे यांनी केले. तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेचे जनता इंग्लिश स्कुलच्या दहावी परिक्षेतील कुमारी भक्ती शिवाजी शेटे (प्रथम 92 टक्के), कुमारी अपुर्वा दत्तात्रय गायकवाड (द्वितीय 92 टक्के), कुमारी समिक्षा सचिन भाकरे (तृतीय85 टक्के) यांचा छोटेखानी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
               प्रारंभी संवत्सर ग्रामपंचायतीचे सदस्य महेश परजणे यांनी प्रास्तविक केले. संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र परजणे म्हणाले की, विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश मोरे, पर्यवेक्षक शरद अबिलवादे, वर्गशिक्षक सुनिल वाघमारे, गणेश आंबरे, भगवान शिद, रमेश दाणे, निवृत्ती तायडे, अनिल बनसोडे, प्रदिप भोये यांच्यासह सर्वच शिक्षकांनी दहावी परिक्षेतील मुला मुलीच्या यशासाठी जे प्रयत्न केले ते कौतुकास्पद आहे. ज्ञानेश्‍वर परजणे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे हुशार मुला मुलींची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यांसाठी सातत्याने कष्ट घेतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वंचित बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा आणली त्यामुळेच ग्रामिण भागात आज अनेक हिरे जन्मला आले आहेत. जनता इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी दहावी परिक्षेत जे यश मिळविले ते गौरवास्पद असुन शिक्षणातुन त्यांनी आयूष्यात नामांकित शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, सैन्यदल, अंतराळ संशोधन, आदि विविध क्षेत्रात नांवलौकीक करून आपल्या गावाचे नांव मोठे करावे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पेन, डायरी, व सामान्यज्ञानाचे पुस्तक भेट देण्यात आले. याप्रसंगी दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे, छाया काळे, केरू शेटे, अर्चना शेटे, दिपाली गायकवाड, सचिन भाकरे आदि उपस्थित होते शेवटी संवत्सर ब्रांच पोष्टमास्तर दत्तात्रय गायकवाड यांनी आभार मानले.

COMMENTS