Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निरंकारी मिशनच्या वतीने आज वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

अहमदनगर ः सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 5 जून रोजी भारतातील 18 पर्वतीय पर्यटन

राहाता शहरामध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात
अनाथांसाठी बालसंस्कार शिबिरे ही मानवतेची तीर्थस्थळे आहेत ः डॉ. बाबुराव उपाध्ये
संगमनेरातील प्रसिद्ध नसीब वडापाव दुकान प्रशासनाकडून सील

अहमदनगर ः सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 5 जून रोजी भारतातील 18 पर्वतीय पर्यटन स्थळांवर सकाळी 8 ते 2 या वेळेत विशाल वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर, पांचगणी, खंडाळा, लोणावळा, पन्हाळा व सोमेश्‍वर यांचा समावेश असून, यात संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक, सेवादल सदस्य, भक्तगण व संबंधित शहरातील रहिवाशी एकत्रितपणे या महाअभियानात सहभागी होतील. ज्यायोगे प्रकृतीच्या संरक्षणार्थ एक अर्थपूर्ण लक्ष्य गाठले जाऊ शकेल.
     याप्रसंगी युवा स्वयंसेवक ‘बीट प्लास्टीक पोल्युशन’ या थीमवर नुक्कड नाटिका सादर करीत पर्यावरण संकटाप्रती जनजागृती करतील. तसेच पर्यावरण रक्षण विषयक घोषणा फलक, बॅनर्सद्वारे संदेश देत मानवी साखळी निर्माण करतील, अशी माहिती मंडळाचे नगर झोन प्रमुख हरिष खुबचंदानी यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, मानवाने नेहमीच स्वत:च्या विकासासाठी प्राकृतिक संसाधनांचे शोषण केले असून, त्याचा परिणाम म्हणून आज आपण पर्यावरणाचा र्हास झाल्याचे पाहात आहोत. या हानीपासून पृथ्वीचा बचाव करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणाप्रति जागृती निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाकडून दरवर्षी ‘विश्‍व पर्यावरण दिवस’चे आयोजन केले जाते, यात संत निरंकारी मिशन सुद्धा 2014 पासूनच सहभागी होत आले आहे. शेवटी खुबचंदानी यांनी सांगितले की, संत निरंकारी मिशन सातत्याने आध्यात्मिक जागृती बरोबर मानवतेच्या सेवेत सदैव समर्पित आहे. यात स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरे तसेच प्रोजेक्ट अमृत (जल साठ्यांचे संरक्षण) इत्यादीं उपक्रम राबवत आहेत.

COMMENTS