Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवरेत स्टार्टअप प्रिझम फोरमची स्थापना  ः डॉ.शिवानंद हिरेमठ

लोणी ः सामाजिक गरज ओळखून ग्रामीण भागातील सुक्ष्म, लघू, आणि मध्यम उद्योगांच्या गरजा समजून त्यांच्या समस्यांना नविन तंत्रज्ञानाद्वारे उपाययोजना व जागति

वासुदेव देसले यांची उपविभागीय पोलिस अधिकारी पदी पदोन्नती
मुख्य बाजार नेप्तीला हलवण्याचा आमदारांचा सोयऱ्यांच्या मदतीने डाव – किरण काळे
महादजी शिंदे इंग्लिश स्कूलचा दहावीचा 100 टक्के निकाल

लोणी ः सामाजिक गरज ओळखून ग्रामीण भागातील सुक्ष्म, लघू, आणि मध्यम उद्योगांच्या गरजा समजून त्यांच्या समस्यांना नविन तंत्रज्ञानाद्वारे उपाययोजना व जागतिक बाजारपेठेमध्ये खेड्या-पाड्यातील छोट्या-मोठ्या उद्योगांना व्यासपिठ निर्माण व्हावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या ध्येयाला चालना देण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत प्रिझम फोरम म्हणजेच प्रवरा रिसर्च इनोव्हेशन स्टार्ट-अप अँण्ड मेडीयम एंटरप्राईज फोरम या संस्थेची नुकतीच स्थापना करण्यात आली असल्याची माहीती संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवांनंद हिरेमठ यांनी दिली.
सुक्ष्म, लघू, आणि मध्यम उद्योगांसाठी इंक्युबेशन सेंटरची सुरूवात केली आहे. याद्वारे ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या सुक्ष्म,लघू, आणि मध्यम उद्योग धंद्यांची माहीती घेवून त्यांना या इंक्युबेशन सेंटरद्वारे नविन तंत्रज्ञानाची माहीती देवून पारंपारीक व नविन तंत्रज्ञानाची सांगड घालून आधूनिक पध्दतीने व्यवसायाची प्रगती व व्यवसाय वृध्दी करून विकास साधणे हा यामागील मुख्य हेतू आहे. प्रिझम फोरमद्वारे सेक्शन 8 नूसार एनजीओची स्थापना केली आहे. या फोरमचे सीईओ डॉ. संजय कुरकुटे, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, संचालक शिवाजी जोंधळे अशा अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रिझम फोरमद्वारे देशातील विविध सरकारी संस्था, विविध नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि स्टार्ट-अप चे जाळे तयार करण्यात मोठे यश पहिल्या टप्यात करण्यात यशस्वी झाले असल्याची डॉ. संजय कुरकुटे यांनी माहीती दिली. याचा परिपाक म्हणून प्रिझम अंतर्गत ई-बाईक व ई-बायसिकलचे उत्पादन तयार करण्यात आले. तसेच सप्लाय चेन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, भूमी सर्च इंजिन यासारख्या सुविधा देखील निर्माण करण्यात आल्या आहेत. या सुविधा सर्वांसाठी विनाशुल्क उपलब्ध आहेत. हैद्राबाद येथील इस्ञो या संस्थेचे संचालक श्रीजी श्रीनिवास यांनी लोणी येथे सॅटेलाईट इन हँन्ड अँण्ड ईट्स अप्लिकेशन्स या विषयावर कार्यशाळा घेतली. डीआरडीओ नवि दिल्ली यांनी उद्योजकता विकासावर मार्गदर्शन केले, इंडियन स्टार्टअपचे मार्गदर्शक क्रिष्णा एरला गड्डा (यु.एस. सनफ्रान्सिस्को), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, यांनी ड्रोन द्वारे फवारणी, रोबोटीक तंत्रज्ञानाचा शेती व्यवसायासाठी वापर, केंद्र शासनाच्या ऑटोमीक एनर्जी विभागाचे प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. आर.एस. शिंदे, आय आय टी मुंबईचे संदिप नाटेकर आदी मान्यवरांनी आतापर्यंत प्रिझम मार्फत मार्गदर्शन केले आहे. दुबई येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्र घडवून आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थी व उद्योजकांना राष्ट्रीय व आंतरष्टर्र्ीय पेटंट करणेसाठी चालना देवून पेटंट मिळणेसाठी प्रयत्न करणे. ईलेक्ट्रीक व्हेईकल टेक्नॉलॉजी, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, सॉफ्टवेअर, ऑटोमॅटीक टेक्नॉलॉजींचा वापर यासर्व गोष्टीं घेडवून आणणे. केंद्रशासनाच्या शिक्षण मंत्रालयामार्फत नाविन्यता कार्यक्रम आयोजित करण्याचे संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील यांचे आगामी उद्दीष्ट असल्याचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, डॉ. संजय कुरकुटे यांनी सांगितले.

COMMENTS