Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरेंवर होणार आचारसंहिता भंगाची कारवाई

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

नवी दिल्ली/मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही तासांचा अवधी असतांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होतांना दिसून य

सरकार मतपेटीतून यायचे आता खोक्यातून येतात
राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची भन्नाट नक्कल
उद्धव ठाकरे 15 दिवसांत एनडीएमध्ये जाणार

नवी दिल्ली/मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही तासांचा अवधी असतांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली होती, त्याप्रकरणी निवडणूक आयोगाने आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, पाचव्या टप्प्यात अर्था 20 मे रोजी मुंबईतील सहा मतदारसंघात संथगतीने मतदान होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली हेाती. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी निव्डणूक आयोगावर गंभीर आरोप केले हेाते. या प्रकरणी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. या पत्रकार परिषदेचे विश्‍लेषण करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या. दरम्यान, ठाकरे या प्रकरणी दोषी आढळले असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. भाजप कटकारस्थान करत असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मते मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदान संथ गतीने करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता, या गंभीर आरोपाप्रकरणी कारवाईचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

आशीष शेलार यांनी केली होती तक्रार – उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही निवडणूक आचार आचारसंहितेचे उल्लंघन आहे, अशी तक्रार भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. तसेच ठाकरे यांनी केलेले आरोप हे खोटे असून दिशाभूल करणारे आहेत असा आरोप देखील त्यांनी केला होता. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहीत पत्रकार परिषदेबद्दल माहिती घेतली होती. तसेच या परिषदेच्या तपासणीचे आदेश देखील दिले होते. राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिले आहेत.

COMMENTS