कोपरगाव तालुका ः आपल्या पाल्याला नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या शाश्वत विश्वासाने पालक आपल्या पाल्यांना संजीवनी इंजिनिअ
कोपरगाव तालुका ः आपल्या पाल्याला नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या शाश्वत विश्वासाने पालक आपल्या पाल्यांना संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतात, याच विश्वासाचा ध्यास घेवुन संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग शाखानिहाय विविध नामांकित कंपन्यांशी संपर्क साधुन कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करतो. अशाच प्रयत्नांमधून अलीकडेच पाच नामांकित कंपन्यांनी सहा नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. अशा प्रकारे दरवर्षी टी अँड पी विभाग शेकडो ग्रामीण विद्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण करीत आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरींग व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या अभियंत्यांचा समावेश आहे. यात अप्लाईड एआय कंपनीने शेखर ज्ञानेश्वर पवारची निवड केली आहे. राहुल कैलास जगधने याची ईगल बाईट आणि सी-डॅक या दोन ठिकाणी निवड झाली आहे. तुषार रामदास सराफची नेत्रवाला मध्ये निवड झाली आहे. मितुशा जयंत पवार, प्रणव पद्माकर थोरात यांची सी-डॅकने निवड केली आहे तर विराज विक्रम आढावची निवड प्रायमसमध्ये झाली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला शैक्षणिक वर्ष 2019-20 पासुन ऑटोनॉमस दर्जा प्राप्त झालेला असल्यामुळे कंपन्यांच्या गरजेनुसार आधुनिक तंत्रज्ञान विषयक अभ्यासक्रम समावेश करण्याची स्वयत्ता आहे. यामुळे पुर्वीची अनेक कामांना योग्य हात नाही तर अनेक हातांना काम नाही, ही विसंगती दुर झाली आहे. याचा परीपाक म्हणुन मागील वर्षी पहिली ऑटोनॉमस बॅच बाहेर पडली, या बॅचच्या तब्बल 770 अभियंत्यांना टी अँड पी विभागाने नामांकित कंपन्यांमध्ये नोकर्या मिळवुन दिल्या. चालु वर्षीही या विभागाची दमदार कामगिरी सुरू आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी वरील सर्व निवड झालेल्या नवोदित अभियंत्यांचे, त्यांच्या पालकांचे, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, टी अँड पी विभागाचे डीन डॉ. विशाल तिडके व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS