Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पासष्टीनिमित्त काव्यातून दोन मित्रांचा गुणगौरव

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील ज्येष्ठ लेखक, कवी पुंडलिक गवंडी यांनी आपल्या दोन मित्रांविषयी, त्या दोघांच्या वयाच्या पासष्टीनिमित्त काव्यांमधून

निळवंड्याच्या लेबर ठेकेदारानेच विकले पुलाच्या कामाचे गज
पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने मुन्नाभाई फरार
साई मल्टीस्टेटने व्यावसायिकांना आधार देण्याचे काम केले ः खा. लोखंडे

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील ज्येष्ठ लेखक, कवी पुंडलिक गवंडी यांनी आपल्या दोन मित्रांविषयी, त्या दोघांच्या वयाच्या पासष्टीनिमित्त काव्यांमधून व्यक्त केलेला हा गुणगौरव आहे. त्यातील एक आहेत श्रीरामपूरचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये तर दुसरे गोव्यातील समाजसेवक अवधूत शिरोडकर. या दोन मित्रांविषयी पासष्ट कवितांमधून त्यांचा जीवनसंघर्ष, कार्य रसाळशैलीतून काव्यपंक्तींमधून उलगडून दाखविला आहे.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्याविषयी भावना प्रकट करताना कवी पुंडलिक गवंडी लिहितात,
सर्वस्वी श्री बाबुराव
ज्ञानरुपी जगताते ॥
जे जो मागतसे त्यांना
ज्ञान देण्यास धावते ॥

धैर्यवान भामा पोटी
जन्म बाबूचा हा झाला ॥
बाप कधी स्वर्गी गेला
नाही आठवत त्याला ॥

वीट भट्टीच्या कामाशी
बाबू राब राब राबे ॥
आई व्याकुळ ती होई
काम नशिबाचे भोग ॥     नंतर कवी पुढील शब्दात डॉ.उपाध्ये यांच्याविषयी व्यक्त होतात..

बाबू थोडा मोठा झाला
कॉलेजात पहा गेला ॥
कर्मवीरांचा हा ध्यास
त्याच्या कामामध्ये आला ॥

मराठीचे सारस्वत
बाबुराव नावाजले ॥
त्यांच्या ज्ञानानं हे पहा
जग असे उजळले ॥

आपले दुसरे मित्र श्री अवधूत शिरोडकर यांच्याविषयी
कवी साध्या, सोप्या काव्यरचनांतून व्यक्त होतात..

मेळाव्यात माणसांच्या । रमे त्यांच्या संगतीत ॥
मदत ही देऊनिया । करी त्यांना आनंदित ॥

जगी दिसे कोणी दु:खी । धावे असा क्षणोक्षणी ॥
घरी असो किंवा दारी । रिता खिसा त्याच क्षणी ॥

असा अवधूत पहा । दत्त गुरु शोभतसे ॥
उषा लक्ष्मी ही तयाची । सरस्वती मनी वसे ॥

पुढे कवी पुंडलिक  गवंडी अवधूत पासष्टी पूर्ण  करताना लिहितात..
जन्मजात दातृत्वाचा । हात सदा असे मोठा ॥
धनधान्य शेतीवाडी । मनी नसे त्यांच्या तोटा ॥

अवधूत मित्र झाला । मनी पांडुरंग आला ॥
तसा पहा पुंडलिका । बंधु माझा हा भेटला ॥
प्रा. डॉ. बाबुराव दत्तात्रय उपाध्ये यांनी प्रतिकूल परिस्थितीतून, उपेक्षित,  कष्टमय जीवनातून शिक्षण घेऊन, रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्य केले. विविध विषयांवर लेखन करीत, त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्री. गवंडी सरांचे दुसरे मित्रवर्य श्री. अवधूत शिरोडकर यांनी आपल्या दानशूरपणातून, शेती, शिक्षण, गरजवंताला मदत यातून एक आदर्शवादी जीवनप्रवास करीत आहेत. म्हणूनच
पासष्टी हा काव्यसंग्रह वाचनीय, प्रेरणादायक आहे. साहित्यविश्‍वात,  मित्रपरिवारात स्वागत होत आहे. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ श्री. अरुण खपले यांनी सुंदर, आकर्षक साकारले आहे.

लेखक ः विलास ज्ञा. पायगुडे
पुस्तकाचे नाव- पासष्टी  
पुंडलिक गंवडी नरवीर प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 56, किंमत : रु. 100 /-

COMMENTS