Homeताज्या बातम्यादेश

बोईंग स्टारलाइनरचे अंतराळ प्रक्षेपण पुन्हा रद्द

नवी दिल्ली : बोईंग स्टारलाइनरचे अंतराळउड्डाण प्रस्थानाच्या 3.50 मिनिटे आधी थांबवण्यात आले. या अंतराळउड्डाण भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स देखील

उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, सव्वा कोटीची विदेशी दारू कंटेनरमधून जप्त | LokNews24
शिक्रापूरजवळील अपघातात पाच जणांचा मृत्यू | DAINIK LOKMNTHAN
आमदार राजन साळवी शिंदे गटात जाण्याचे संकेत ?

नवी दिल्ली : बोईंग स्टारलाइनरचे अंतराळउड्डाण प्रस्थानाच्या 3.50 मिनिटे आधी थांबवण्यात आले. या अंतराळउड्डाण भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स देखील उड्डाण घेणार होत्या. हे उड्डाण दुसर्‍यांदा स्थगित करण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. जगभरात ओळख मिळविलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा तिसरा अवकाश प्रवास शनिवारी अंतिम टप्प्यात पुन्हा स्थगित करण्यात आला.
 प्रक्षेपकात तांत्रिक बिघाड असल्याच्या कारणाने शेवटच्या क्षणी हे उड्डाण पुन्हा स्थगित करण्यात आले. हे प्रक्षेपण स्थगित करण्याची ही दुसरी वेळ आहे. जगभरात ओळख मिळविलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा तिसरा अवकाश प्रवास शनिवारी अंतिम टप्प्यात पुन्हा स्थगित करण्यात आला. प्रक्षेपकात तांत्रिक बिघाड असल्याच्या कारणाने शेवटच्या क्षणी हे उड्डाण पुन्हा स्थगित करण्यात आले. हे प्रक्षेपण स्थगित करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 7 मे रोजी सुनीता विल्यम्सचे अंतराळयान जाण्यासाठी तयार होत्या. मात्र, त्यावेळी देखील प्रक्षेपण काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले होते. हे दोन्ही अंतराळवीर फ्लोरिडा येथून टलस व्ही रॉकेटद्वारे प्रवास करणार होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही अंतराळवीर पूर्णपणे सुरक्षित आहेत. आता येत्या 24 तासांत अंतराळ प्रवास सुरू होईल, असे नासाचे म्हणणे आहे. मात्र, वेळेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ग्राउंड लॉन्च सिक्वेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला.

COMMENTS