कोपरगाव : पावसाळा सुरु होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्म
कोपरगाव : पावसाळा सुरु होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणे, त्यामुळे गावा-गावांचा सपर्क तुटणे, वादळ, अतिवृष्टीमुळे विजेचे खांब उखडले जाऊन वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होवून त्यामुळे उदभवणार्या अडचणी अशा एक ना अनेक आपत्ती निर्माण होतात. त्यामुळे अशा संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे असे आवाहन आवाहन आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना केले आहे.
मान्सूनपूर्व तयारी बाबतचा आढावा घेण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.29) रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सर्व प्रशासकीय अधिकार्यांची बैठक घेतली या वेळी उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. आ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की,चालू वर्षी हवामान खात्याने होणार्या पर्जन्यमानाचा दिलेला अंदाज पाहता आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने प्रशासनाने सर्वप्रकारची पूर्वतयारी करून ठेवावी. नादुरुस्त स्थितीत असलेली वीज अटकाव यंत्र तत्काळ दुरुस्त करून घ्यावीत. आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व विभागांनी समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी व मतदार संघातील नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी. नाल्यांच्या सफाईची कामे तातडीने पूर्ण करून जीर्ण इमारती आणि पुलांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी सीमांकन करून पूर प्रतिबंधक समितीची स्थापना करावी. आपत्ती काळात त्वरित संपर्क करण्यासाठी विविध आवश्यक विभागांचे आणि संपर्क यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवावेत, तसेच हे क्रमांक नेहमी सक्रीय असतील याची दक्षता घ्यावी.बचाव पथकांचे प्रशिक्षण, बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करुन हवामान खात्याकडून वेळोवेळी येणारे धोक्याचे इशारे प्राप्त होताच योग्य माहिती सर्वदूर जलद गतीने पोहोचविण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करावा. पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने नागरिकांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधसाठा आदी सामुग्रीबाबत नियोजनपुर्वक व्यवस्था करावी तसेच मतदार संघात ज्या ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाण्याची गरज असेल अशा सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. यावेळी तहसीलदार विकास गंबरे,नायब तासिलदार सातपुते, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे,कोपरगाव नगरपरीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप, ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. गुट्टे, उपविभागीय जलसंधारन अधिकारी श्रीम.प्रतिभा खेमनर, यांच्यासह अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करुन नियंत्रण कक्षात पूर्ण कर्मचार्यांची नियुक्ती करावी. 24 तास नियंत्रण कक्ष सुरू राहील व नागरिकांना तातडीने मदत कशी पुरविता येईल याची काळजी घ्या. दुर्घटना टाळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून दुर्घटनामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी दक्षता घ्या. आपत्तीच्या काळात झालेल्या नुकसानीचे संयुक्तरित्या पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करावा. नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत सतर्क रहा. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवा. सर्व विभागाच्या अधिकार्यांनी समन्वयाने काम करावे. आ. आशुतोष काळे.
COMMENTS