Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने 3 जून रोजी रक्तदान शिबीर

जामखेड ः आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजारी व्यक्तींना रक्ताची गरज असून कोणत्याही माणसाला रक्ताची उणीव भासू नये. यामुळे मी रक्तदान करणार, तुम्ही

संगमनेरातील प्रसिद्ध नसीब वडापाव दुकान प्रशासनाकडून सील
 मुंबईतील चित्रपट नगरी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री पळवून नेतील-  आमदार रोहित पवार 
महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवायचे ः जयंत पाटील

जामखेड ः आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजारी व्यक्तींना रक्ताची गरज असून कोणत्याही माणसाला रक्ताची उणीव भासू नये. यामुळे मी रक्तदान करणार, तुम्हीही दरवर्षीप्रमाणे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड पोलिस स्टेशन येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत असते. परंतु यावर्षी लोकसभा निवडणुक कामात व्यस्त असल्याने 1 मे ला रक्तदान शिबीर आयोजित करता आले नाही. तरी तरुणांमध्ये देशाप्रती, समाजाप्रती, भारत राष्ट्राप्रती प्रेमाची आणि त्यागाची भावना जागृत राहण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
आजच्या काळात विविध आजारांचे प्रादुर्भाव वाढले असून रक्तदात्यांची संख्या त्या प्रमाणात कमी आहे. परिणामी, नेहमीच रक्ताची कमतरता भासते.  (1 मे महाराष्ट्र दिन) या दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान शिबिराची संख्याही कमी झाली आहे. स्वेच्छेने रक्तदान करणार्‍यांच्या मनात ही असुरक्षितता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे लोकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 3 जून 2024  रोजी सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान करण्याचे आवाहन  – जामखेड शहरासह तालुक्यातील सर्व राजकीय संघटना, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, मेडिकल संघटना, वैद्यकीय सेवा संघटना, रिक्षा चालक संघटना, नाभिक संघटना,   गॅरेज मेकॅनिक संघटना, हॉटेल मालक संघटना,  विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध खेळातील खेळाडू,  छउउ/छडड छात्र,  पेट्रोल पंप मालक संघटना, मंगल कार्यालय संघटना, शासकीय कर्मचारी व युवा तरूणांनी या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशन वतीने रक्तदात्यांना केले आहे. यासाठी  रक्तदान संपर्क, पो.ना.अविनाश ढेरे मोबाईल क्रमांक.8888837545 पो.कॉ.प्रकास जाधव मो.न.8806623459 करण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS