Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेदिका ढगेवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या जेरबंद

बिबट्याचा शोध घेण्यासाठी ट्रॅप व ड्रोन कॅमेर्‍याचा वापर

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे दोन दिवसापूर्वी तीन वर्षाच्या वेदिका श्रीकांत ढगे हि बालिका सकाळी आठच्या घरासमोरील अंगणात खेळत अस

तरुणाचा खून करून हल्लेखोर पसार | DAINIK LOKMNTHAN
अहमदनगर : पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाचे धरणे आंदोलन
वाळू तस्कराचा महसूल पथकातील तलाठ्यावर हल्ला

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे दोन दिवसापूर्वी तीन वर्षाच्या वेदिका श्रीकांत ढगे हि बालिका सकाळी आठच्या घरासमोरील अंगणात खेळत असताना नरभक्षक बिबट्याने पाठीमागून हल्ला करुन बालिकेच्या नरडीचा घोट घेतला.हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या रविवारी सकाळी अखेर जेरबंद झाला आहे.सदरचा बिबट्या मादी असुन दोन वर्ष वयाची असल्याचा अंदाज वन अधिकार्‍यांनी व्यक्त केला.बिबट्या सध्या डिग्रसच्या रोपवाटीकेत पाहुणचार घेत आहे.
                   राहुरी तालुक्यातील वरवंडी येथिल माजी सरपंच श्रीकांत रावसाहेब ढगे यांच्या वस्तीवर गुरवारी सकाळी 8 वाजता वेदिका ढगे हि घरासमोरील अंगणात खेळत असताना गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक पाठीमागच्या बाजुने वेदिकावर हल्ला केला.साधारण शंभर ते दिडशे फुटा पर्यंत बिबट्याने वेदिकाला ओढीत नेले.त्याचवेळी घरातील महिला व पुरुष शेजारील लोकांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने वेदिकाला टाकुन बिबट्याने धुम ठोकली.वेदिका उपचारापुर्वीच मृत झाल्याचे डाँक्टर यांनी घोषीत केले. गुरूवारी परिसरात काही ठिकाणी पिंजरे लावण्यात आले.परंतू वन विभागाच्या पिंजर्‍याला बिबट्याने हुलकावनी दिली.वनक्षेञपाल युवराज पाचारणे, एल.पी. शेंडगे, के.एस रोकडे, एस.एस.शहाणे आदींनी शुक्रवारी सकाळी नरभक्षक बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कँमेर्‍याचा वापर करण्याचा निर्णय घेतला. दिवसभर ड्रोन कँमेर्‍याद्वारे बिबट्याचा दोनशे ते तीनशे एक्कर क्षेत्रात शोध घेतला परंतू बिबट्याचा शोध लागला नाही. अखेर शनिवारी सकाळी पिंजर्‍याची संख्या वाढविण्यात आली.पिंजर्‍या सोबत ट्रँप कँमेरा बसविण्यात आले होते.लावण्यात आलेल्या पिंजर्‍यातील दोन नंबरच्या पिंजर्‍यात नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला.सदरचा बिबट्या मादी जातीची असुन दोन वर्ष वयाची आहे. घटना घडल्यापासुन वनविभागाचे चाळीस ते पन्नास कर्मचारी बिबट्याचा शोध घेत होते.पाच कर्मचारी दिवस राञ गस्त घालण्याचे काम करीत होते. अखेर रविवारी सकाळी वन विभागाने लावलेल्या सापळ्यात नरभक्षक मादी अडकली. घटना स्थळापासुन  दोनशे ते तीनशे फुटाच्या अंतरावर पिंजरा लावण्यात आला होता.या दोन नंबरच्या पिंजर्‍यात नरभक्षक बिबट्या अलगद अडकला गेला. वन विभागाच्या अधिकारी व वनरक्षक कर्मचार्‍यांनी जेरबंद बिबट्यास डिग्रस येथिल रोटवाटीकेत पाहुणचार घेण्याससाठी ठेवण्यात आले आहे. घडलेल्या घटनेतील नरभक्षक बिबट्या अखेर पिंजर्‍यात अडकल्याची बातमी वार्‍या सारखी पसरली.बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली.वन विभागाच्या वनरक्षक कर्मचार्‍यांनी व परिसरातील शेतकर्‍यांनी सुटकेचा श्‍वास सोडला. घटना  घडल्यापासून परिसरातील शेतकरी वर्ग  बिबट्याच्या दहशहती खाली होते. बिबट्याच्या शोध मोहिमेत वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे, एल.पी. शेंडगे, के.एस रोकडे, एस.एस. शहाणे वनरक्षक सतिष जाधव, आर.एस. रायकर, पी.एस. निकम, मदन गाडेकर, समाधान चव्हाण,राजेंद्र घुगे, अंकराज जाधव, विलास तमनर  प्रकाश ढोकणे  आदींनी बिबट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले. बिबट्या जेरबंद झाल्या नंतर वनविभागाचे वनक्षेञपाल युवराज पाचारणे व त्या पथकाचे आभार व्यक्त केले.

COMMENTS