Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी कामगार संघटनेच्या अहमदनगर अध्यक्षपदी रोहिदास अडसूळ

शेवगाव तालुका ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एकमेव मान्यता प्राप्त संघटनेची 22 मे रोजी अहमदनगर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झा

सेवानिवृत्तीनंतरही एका कुटुंबाप्रमाणे सुखदुःखात सहभाग – थोरात
चक्क भिकारी व अल्पवयीन मुलांच्या नावावर लाखोंचे कर्ज…;शेवगाव नगर अर्बन बँक बनावट सोने तारण घोटाळ्याच्या सुरस कथा चर्चेत
गाव दत्तक घेऊन आदर्शगावची निर्मिती करावी

शेवगाव तालुका ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एकमेव मान्यता प्राप्त संघटनेची 22 मे रोजी अहमदनगर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी अहमदनगर विभागातील सर्व आगाराचे पदाधिकारी व सभासद मोठ्या प्रमाणात हजर होते. यावेळी 2023 या सालचे विभागीय अध्यक्ष व डि जी अकोलकर व विभागीय सचिव शिवाजीराव कडूस हे महामंडळाच्या सेवानिवृत्त झाल्याने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 2023 सालचे विभागीय कार्याध्यक्ष रोहिदास अडसूळ यांची 2024 या वर्षासाठी विभागीय अध्यक्ष म्हणून तर शेवगाव आगाराचे आगार सचिव दिलीपराव लबडे यांची विभागीय सचिव म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली होती. विभागातील सभासदांचा उत्साह पाहता शेवगाव आहारामध्ये मध्ये आज रविवार दि 26 रोजी फटाक्यांच्या आदेश बाजी मध्ये त्यांचे शेवगाव आगारातील कर्मचारी व अधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी शेवगाव तालुका पत्रकार संघ यांनी त्यांचे अभिनंदन स्वागत केले.
        यावेळी शेवगाव आगार पदाची जागा रिक्त झाल्यामुळे जगन्नाथ तुकाराम पवार यांची सर्वांमध्ये शेवगाव आगार सचिव म्हणून निवड करण्यात आली. उपस्थित कर्मचारी व मान्यवरांनी पवार यांचे अभिनंदन करून स्वागत केले. यावेळी इंटक संघटनेचे संजय गीते यांनी आपल्या असंख्य सहकार्यासह कामगार संघटनेचे नेतृत्वावर विश्‍वास ठेवून संघटनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचाही सन्मान करण्यात आला.
   याप्रसंगी अहमदनगर विभागीय कार्यालयाचे माजी सचिव प्रवीण ढगे, माजी अध्यक्ष राहुल जाधव, शेवगाव आगार अध्यक्ष संजय धनवडे, लक्ष्मण लव्हाट, गणेश बर्गे, दत्तात्रय गाडेकर, पांडुरंग देशमुख, उद्धव ठाकरे गट शिवसेनेत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष अविनाश मगरे, सुनील रासने,  एसटी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष क्रॉ अध्यक्ष संजय नांगरे, राजे शिवाजी निधी चे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव मडके, शेवगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलास बुधवंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, डॉ अमित फडके, इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नागरे यांनी केले तर आभार पांडुरंग देशमुख यांनी मानले.

COMMENTS