Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वादळामुळे सोलर पॅनल भुईसपाट ; शेतकरी चिंतेत

कर्जत : कर्जत तालुक्यात 20 मे रेाजी विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यासह पाऊस झाला. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

नगरच्या कलावंताला मिळाला बहुमान ; जगताप यांच्या चित्रांची राष्ट्रीय चित्रप्रदर्शनासाठी निवड
मयत तरुणांच्या कुटुंबाला आठ लाखाची मदत
नगर शहराच्या आमदारांचं नीच राजकारण…. फलक लावत निषेध

कर्जत : कर्जत तालुक्यात 20 मे रेाजी विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यासह पाऊस झाला. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अळसुंदे येथील आजिनाथ मच्छिंद्र आढाव यांच्या शेतात नुकतेच बसवलेले सोलर पॅनल उलथून पडले. त्यामध्ये सोलर प्लेटची मोडतोड झाल्याने नवीन बसवलेले हे पॅनल नादुरुस्त झाले आहे. आढाव यांच्या शेतात कुसुम सोलर योजनेअंतर्गत हे सोलर पॅनल बसवण्यात आले होते. अवकाळी पाऊस व वादळामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आढाव यांच्या सोलर पॅनल नुकसानीचा पंचनामा ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला आहे. वादळामुळे झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

COMMENTS