Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण 

5 जणाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : काही दिवसापूर्वी झालेल्या वादाची पोलिसात तक्रार केल्याचा रागातून पोलीस ठाण्यात तक्रार का दाखल केली अशी विचारणा करून पाच जणांनी एकास शिव

वसुंधरेचे संरक्षण नागरिकांचे कर्तव्य : डॉ. सिद्दिकी
मुंबई महापालिकेच्या मदतीला बॉलिवूडकर सरसावले, अजय देवगणकडून 1 कोटींची देणगी | Bollywood | LokNews24
खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर : काही दिवसापूर्वी झालेल्या वादाची पोलिसात तक्रार केल्याचा रागातून पोलीस ठाण्यात तक्रार का दाखल केली अशी विचारणा करून पाच जणांनी एकास शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली व कोणत्यातरी शस्राने मारून जखमी केले ही घटना माळीवाडा परिसरातील वाडियापार्क येथे घडली.

 याबाबतची माहिती अशी की सुनिल लक्ष्मण कोडम (रा श्रमिकनगर भिस्तबाग नाका सावेडी अहमदनगर) यांचें गांधी मैदान येथील मार्कंडेय मंदिराचे बांधकामवरुन  तोफखाना येथे राहणारे राजेंद्र बोगा, प्रणव राजेंद्र बोगा, संजय बोगा, विनोद बोगा यांच्यात काही दिवसापुर्वी वाद झाले होते. त्याबाबत कोडम यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दि 19 कोडम हे पद्मशाली समाजाचे पि.पि. एल (पद्मशाली प्रिमिअर लिंग) क्रिकेट मॅच स्पर्धा पाहण्यासाठी वाडियापार्क मैदानावर गेले होते तेव्हा कोडम हे तेथील मैदानावर बसुन क्रिकेट पाहत असतांना संजय बोगा याने त्यांना स्टेजच्या खाली बोलावले व तु आमच्या विरोधात तक्रार का दिली असे म्हणुन लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर राजेंद्र बोगा, प्रणव राजेंद्र बोगा, विनोद बोगा व एक अनोळखी ईसम हे देखील तेथे आले व त्यानी देखील कोडम याला लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ केली .त्यानंतर त्यांनी कोडमला त्या ठिकाणाहून मैदानाच्या प्रवेश गेटवर नेले व तेथे परत एकदा मारहाण केली.त्यावेळी  कोणितरी एकाने कोणत्यातरी शस्त्राने कोडमच्या डोक्यात व मानेच्या खाली मारले. या वेळी तेथें नागरिक जमा झाल्याने मारहाण करणारे त्या ठिकाणाहून निघुन गेले.

  याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुनील कोडम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजेंद्र बोगा,प्रणव बोगा, संजय बोगा, विनोद बोगा, व एक अनोळखी ईसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस हवालदार औटी हे करित आहेत

COMMENTS