Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कलियुगात पुण्यकर्मच महत्वाचे ः परमानंदगिरी महाराज

कोपरगाव शहर ः पुण्याकर्मामुळे सुखाची प्राप्ती होते तर मुर्त्यू नंतर मोक्ष प्राप्त होतो. पापकर्मामुळे दुःख होते तर मुर्त्यु नंतर नर्काची प्राप्ती

पांडुरंगा आता तरी दर्शन देशील का.. ?l Lok News24
वाळकीमध्ये वाळूची चोरटी वाहतूक करणारा टेम्पो पकडला
राजकीय सूड उगवण्यासाठी 30 कोटी केले शासनाला परत

कोपरगाव शहर ः पुण्याकर्मामुळे सुखाची प्राप्ती होते तर मुर्त्यू नंतर मोक्ष प्राप्त होतो. पापकर्मामुळे दुःख होते तर मुर्त्यु नंतर नर्काची प्राप्ती होते.त्यासाठी पुण्यकर्म करणे फार महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर परमानंद गिरी महाराज यांनी तालुक्यातील कान्हेगाव येथे जपाणुष्टाण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्रवचन प्रसंगी ते भाविकांना उपदेश करतांना ते बोलत होते. जो जन्माला आला तो मरणार आहे. आपले मरण कोणालाही माहिती नाही ते फक्त काळाला माहिती आहे.आपण झोपतो पण काळ झोपत नाही. काळ आपली घडी घडीला वाट पाहत आहे की अजून किती वेळ राहिला.वेळ संपली की काळ जीवाला घेऊन जातो.जसा बोका अचानक उंदिराला घेऊन जातो तसा काळ आपल्या जिवाला घेऊन जातो. या जगात सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर परम्यातम्याला आपलसं करून घ्यावं लागतं.त्यासाठी काया,वाचा व मनाने पवित्र व्हावे लागते असे महाराजांनी यावेळी सांगितले. सदर सत्संग प्रसंगी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.यावेळी कान्हेगाव,वारी, भोजडे ,रामवाडी, संवत्सर,धोत्रे,तळेगाव, अंदरसुल, सडे आदीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन काजळे,संदीप वाळुंज,बाळासाहेब काजळे,राजेंद्र सांगळे,वसंतराव भाकरे ड वाल्मीक काजळे, सुनील काजळे ,पत्रकार जनार्दन जगताप यांचेसह सर्व तरुण मंडळ,भजनी मंडळ परिश्रम घेत आहेत.

COMMENTS