Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.थोरात यांनी पठार भागात भेट देऊन साधला नागरिकांशी संवाद

वाडी वस्तीवर भेट देऊन अडीअडचणी समजून घेतल्या

संगमनेर ः लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी प्रचाराची प्रमुख धुरा सांभाळणारे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आम

महसूलमंत्री ना. थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक – नामदार कदम
अहमदनगर शहरातील विकास आराखडा आणि ओढ्या-नाल्यांचा प्रश्‍न
सामाजिक ऋण निस्वार्थ भावनेने फेडणारा अवलिया

संगमनेर ः लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी प्रचाराची प्रमुख धुरा सांभाळणारे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यभरातील प्रचार मोहीम संपताच आज पठार भागातील विविध वाडी वस्तीवर भेट देऊन नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेत सर्वांशी संवाद साधला.
विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज साकुर गटातील शेंडेवाडी, सतीची वाडी, हिवरगाव पठार, गिर्‍हेवाडी या वाड्या वस्त्यांवर भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला. यावेळी मार्केट कमिटीचे सभापती शंकरराव खेमनर, जि.प.सदस्या सौ.मिराताई शेटे, कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, सचिन खेमनर, जयराम ढेरंगे व आदि सह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार थोरात यांनी पठार भागातील वाड्यांवर जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. उन्हाळ्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासनासह यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, मागील दोन – तीन महिने लोकसभेची रणधुमाळी सुरू महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळताना संपूर्ण राज्यभर दौरा करावा लागला.या सर्व प्रचार सभांना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशामध्ये भाजपा सरकार विरुद्ध मोठी लाट असून राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या 40 च्या पुढे जागा येणार आहेत. आपण राज्यभर प्रचाराला फिरत असताना संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगली नियोजन करून तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचे काम केले. जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार ही आघाडीचेच निवडून येणार आहेत. आपला संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा आहे. पठार भाग, प्रवारा पट्टा आणि तळेगाव भाग अशी भौगोलिक दृष्ट्या तीन विभाग आहे. तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीवर अविरतपणे विकासाच्या विविध योजना राबवल्या जात आहे .वीज, रस्ते पाणी हे मूलभूत प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण सातत्याने काम करत आहोत. सततच्या कामामुळे संगमनेर तालुका हा ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. यावर्षी राज्यभरासह संगमनेर तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला. संगमनेर तालुका हा पर्जन्य छायेचा भाग आहे. त्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याच्या अडचणी आहेत. परंतु प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत तातडीने टँकरची व्यवस्था करावी.  याचबरोबर नागरिकांच्या विविध अडचणी समजून घेत.त्या तातडीने सोडवण्यासाठी काम करण्यात येईल असेही ते म्हणाले. तर शंकर पा खेमनर म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी होती. हे सर्व करत असताना आपल्या वाडी वस्तीचा विकास आणि या कामावरही त्यांचे बारकाईने लक्ष आहे. पठार भागातील अगदी टोकाच्या वाडीसाठी सुद्धा त्यांनी सातत्याने काम केले असून  इंद्रजीत भाऊ थोरात व यशोधन कार्यालय यांच्याकडून प्रत्येक कामासाठी मोठा पाठपुरावा केला जात असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी विविध गावांमधून नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक ठिकाणी युवकांचा मोठा उत्स्फूर्त सहभाग राहिला

COMMENTS