Homeताज्या बातम्यादेश

प्रचारादरम्यान कन्हैया कुमारच्या कानशिलात लगावली

नवी दिल्ली ः निवडणूक प्रचारादरम्यान दिल्लीच्या उत्तर मतदारसंघातून काँग्रेस आणि इंडिया ब्लॉकचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्यासोबत मारहाणीचे प्रकरण

अकोले तालुक्यात स्टार्टअप यात्रा उत्साहात
आम्ही कुणाला वाइन प्या असे म्हणू शकत नाही, म्हणणारही नाही | LOKNews24
एनसीईआरटी : नव्या पिढीला अज्ञानाकडे नेणारे साधन बनले ! 

नवी दिल्ली ः निवडणूक प्रचारादरम्यान दिल्लीच्या उत्तर मतदारसंघातून काँग्रेस आणि इंडिया ब्लॉकचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्यासोबत मारहाणीचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक व्यक्ती कन्हैया कुमारला हार घालण्याच्या बहाण्याने आला आणि त्याच्या कानशिलात लगावली. कन्हैयाकुमारवर शाईही फेकली. कन्हैयाच्या समर्थकांनी तत्काळ त्या तरुणाला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. या काळात हल्लेखोराला अनेक जखमा झाल्या. मात्र, कन्हैया कुमार सुखरूप आहे. या घटनेदरम्यान आपच्या महिला नगरसेवक छाया शर्मा यांचीही बाचाबाची झाली. याबाबत छाया यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

COMMENTS