लोकसभा निवडणूका सुरू असताना कोणत्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळेल, यावर चर्चा करणे लोकांना नेहमीच आवडते. त्यातूनच सेफाॅलाॅजिस्ट ही संकल्पना म
लोकसभा निवडणूका सुरू असताना कोणत्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळेल, यावर चर्चा करणे लोकांना नेहमीच आवडते. त्यातूनच सेफाॅलाॅजिस्ट ही संकल्पना मोठ्या प्रमाणात मान्यता पावली. जागतिकीकरणाच्या काळानंतर ही संकल्पना अधिकच मोठी झाली. कोणत्याही मोठ्या होणाऱ्या गोष्टींबरोबरच त्याचे दुष्परिणामही येतात. निवडणूकीचा अंदाज व्यक्त करणारे, सेफाॅलाॅजिस्ट मात्र ज्या वेगाने आले, वाढले, त्याच वेगाने यि क्षेत्रांतून बाहेर पडले. याचे कारण निवडणूक काळात सेफाॅलाॅजिस्ट यांच्याकडून तयार होणारी प्रत्यक्ष पाहणीतील आकडेवारी, आपल्या बाजूने झुकावी, असे राजकीय नेते आणि पक्षांना वाटत असते. त्यातूनच पाहणी अहवालांचे पीक आले. पाहणी अहवालात आपल्या बाजूने झुकणारा निकाल दाखवला जावा, जेणेकरून मतदारांना त्याचे आकर्षण निर्माण होईल. या पाहणी अहवालांचा झालेला सुळसुळाट अन् त्याने व्यक्त केलें फोल अंदाज, यामुळे याविरोधात न्यायालयात याचिका गेल्या. मतदान पूर्व अंदाज व्यक्त करायला बंदी घालण्यात आली. शिवाय यात दडलेले अर्थकारण, यामुळे भल्या भल्या सेफाॅलॉजिस्टच्या विषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला की, हे लोक सर्वे किंवा पाहणीच्या नावाखाली कोणत्यातरी एका पक्षाला फेवर करतात आणि त्या अनुषंगाने अहवाल बनवतात
त्यामुळे एक लाट जी आली होती, त्यामध्ये बराच फरक पडला. आता देशात काही मोजकेच सेफाॅलाॅजिस्ट राहिले आहेत. अर्थात नगरपालिका-जिल्हा परिषद पासून तर लोकसभेपर्यंत होणाऱ्या निवडणुकांमध्ये अनेक जण अशा पाहणी अहवालांना बनविण्यासाठी घिरट्या घालत असतात. तरीही आज देशांमध्ये दोन सेफॉलॉजिस्ट अंदाज व्यक्त करत आहेत; त्यामध्ये पहिलं नाव अर्थात, डॉ. योगेंद्र यादव आणि दुसरं नाव प्रशांत किशोर. २०१४ मध्ये प्रशांत किशोर हे अधिक प्रकाश झोतात आले. ज्यावेळी मोदींची सत्ता केंद्रामध्ये आली होती. परंतु २०२४
येईपर्यंत प्रशांत किशोर यांचा सेफोलॉजिस्ट म्हणून जो व्यवसाय होता तोच बंद केला. ते राजकारणात सक्रिय झाले. अर्थात, त्यांचे राजकारण सध्या तरी बिहार पुरतेच आहे. परंतु, अधून मधून सारख्या ते प्रसिद्धीला येतात. त्यांच्या अंदाजाप्रमाणे मोदी सरकारला किंवा भाजपाला पुन्हा बहुमत मिळेल आणि ते सत्तेवर येतील! हे बहुमत जवळपास ३०० पर्यंत राहिल, असा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. अर्थात, आज देशामध्ये हे कोणीही मानायला तयार नाही की, आगामी निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला एवढेच नव्हे तर एनडीए ला बहुमत मिळेल, यावरच कोणाला विश्वास राहिलेला नाही! त्यामुळे प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा भाजप खूप मोठी लीड घेईल, असं वक्तव्य करून राहिलेल्या तीन टप्प्यातील मतदानामध्ये फरक पाडता येईल का, या मानसिकेतून हे वक्तव्य केले आहे. दुसऱ्या बाजूला डॉ. योगेंद्र यादव यांनी राहुल गांधी यांच्या दोन्ही पदयात्रेमध्ये सक्रिय भूमिका निभावली. त्यांचा अंदाज देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रत्येक राज्यात जाऊन, तिथे प्रत्यक्ष पाहणीचा जो अंदाज व्यक्त केला आहे, तो मतदारांना आणि जनतेला अगदी तटस्थ वाटतो. त्यांच्या आकडेवारीमुळे त्यांनी हे थेट आणि आत्मविश्वासपूर्वक सांगितले आहे की, भाजपा आणि एनडीए मिळून देखील त्यांना बहुमताचा आकडा गाठता येणार नाही! कोणत्याही परिस्थितीत इंडिया आघाडीची सत्ता देशावर येईल, हे त्यांनी ठामपणे बजावले आहे. त्याच वेळी प्रशांत किशोर मात्र भाजपची सत्ता येईल असं वक्तव्य करताहेत. देश मात्र, सध्यातरी डॉ. योगेंद्र यादव यांच्याकडे झुकला आहे.
COMMENTS