मुंबई ः माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड(एमडीएल) अर्थात माझगाव गोदीला 250 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अडीच शतकांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या असामान्
मुंबई ः माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड(एमडीएल) अर्थात माझगाव गोदीला 250 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अडीच शतकांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या असामान्य प्रवासाची आठवण कायम राखण्यासाठी आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 1774 मध्ये एका लहानशा सुक्या गोदीच्या उभारणीने अतिशय साधेपणाने झालेल्या प्रारंभापासून ते 1934 मध्ये तिच्या स्थापनेपासून आणि त्यानंतर भारत सरकारच्या अखत्यारित 1960 पासून केलेली सेवा, असा एमडीएलचा 250 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास म्हणजे चिकाटी, वृद्धी आणि शाश्वत वारसा यांचा दाखला आहे.
अतिशय महत्त्वाचा हा प्रसंग साजरा करण्यासाठी एमडीएलने आज विविध कार्यक्रमांची एक मालिका आयोजित केली होती. यामध्ये एमपीएकडून गोदीलगत असलेल्या अधिग्रहित जमिनीचे उद्घाटन, अरोवाना या स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीचे उद्घाटन, सोलर इलेक्ट्रिक हायब्रिड बोटीचे जलावतरण, गोदीला 250 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एमडीएलच्या विशेष नाण्याचे प्रकाशन आणि दिवसभर चालणार्या तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन या कार्यक्रमांचा समावेश होता. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. मुंबई बंदर प्राधिकरणाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या गोदीलगत असलेल्या भूखंडाचे संरक्षण सचिवांनी औपचारिकपणे उद्घाटन केले. नवीन जहाजांची एकाच वेळी बांधणी आणि त्यावरील सामग्रीची उभारणी , विविध प्रकारच्या जहाजांची दुरुस्ती आणि उपकरणे बसवणे या कामांसाठी ही सुविधा वापरली जाणार आहे. या नव्या पायाभूत सुविधेमुळे विविध प्रकल्पांची एकाच वेळी अंमलबजावणी करण्यासाठी एमडीएलला पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे. एमडीएलने अरोवाना नावाच्या लहान आकाराच्या(चळवसशीं) पाणबुडीच्या प्लॅटफॉर्मची रचना आणि हल पूर्ण करण्यात यश मिळवले आहे, जिचे आज संरक्षण सचिवांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 1984 पासून एमडीएल परदेशी डिझाईनच्या पाणबुड्यांची उभारणी करत आहे. मात्र एमडीएलने स्वदेशी बनावटीच्या पारंपरिक पाणबुड्यांची रचना आणि विकास देखील सुरू केला आहे. चळवसशीं पाणबुडी ही संकल्पनेचा दाखला म्हणून विकसित केली जात आहे. ही पाणबुडी तयार करणारा चमू 2028 पर्यंत एका पूर्ण क्षमतेच्या पारंपरिक पाणबुडीची रचना करण्यासाठी समांतर काम करत आहे. संरक्षण सचिवांनी सोलर इलेक्ट्रिक हायब्रिड बोटीचे देखील जलावतरण केले. या बोटीचा सर्वाधिक वेग 11 नॉट असून, स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान असलेल्या भागीदाराच्या मदतीने तिची रचना आणि विकास करण्यात आला आहे. तिचा वापराचा खर्च डिझेल बोटीच्या 1/10 आहे आणि देखभालीचा खर्च देखील अत्यल्प आहे. या व्यतिरिक्त एमडीएलने संकल्पना मांडलेल्या आणि स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान असलेल्या भागीदाराच्या मदतीने सह-विकास केलेल्या सूची नावाच्या 24 पॅक्स फ्युएल सेल इलेक्ट्रिक फेरीचे देखील संरक्षण सचिवांनी जलावतरण केले. तिच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये शून्य उत्सर्जन,स्वच्छ जलमार्गाला प्रोत्साहन आणि पर्यावरण संवर्धनामध्ये योगदान यांचा समावेश आहे. अरमाने यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि जहाजबांधणीचे भवितव्य या विषयावरील तांत्रिक चर्चासत्राचे देखील उद्घाटन केले. एमडीएलच्या अस्तित्वाला 250 वर्षे पूर्ण होण्याची आठवण ठेवण्यासाठी, एमडीएलचा समृद्ध इतिहास आणि वृद्धिंगत होणारा वारसा यांचा सन्मान करण्यासाठी आरबीआयने जारी केलेल्या स्मृती नाण्याचे देखील संरक्षण सचिवांनी प्रकाशन केले. एमडीएल हे भारताच्या शिरपेचातील एक मौल्यवान रत्न आहे आणि नौदल आणि व्यावसायिक वापरासाठी जहाजबांधणीच्या क्षमता उभारणीमध्ये या संस्थेने मोठे योगदान दिले आहे, अशा शब्दात संरक्षण सचिवांनी एमडीएलची प्रशंसा केली. एमडीएल ही देशातील सर्वात मोठी जहाजबांधणी करणारी गोदी आहे आणि भारतीय नौदलाच्या बहुतेक सामग्रीमध्ये योगदान देत आहे, असे ते म्हणाले. आजचा समारंभ केवळ एमडीएलच्या प्रवासाचेच प्रतीक नव्हे तर सागरी व्यवहारांमधील उत्कृष्टतेसाठीच्या वचनबद्धतेचा दाखला देखील ठरला आहे.
COMMENTS