राहाता ः राहात्याच्या स्मशानभुमीचे फोटो पहाताच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अरे वाह...क्या बात है, असे उदगार काढले. कोपरगाव तालुक्यातील
राहाता ः राहात्याच्या स्मशानभुमीचे फोटो पहाताच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अरे वाह…क्या बात है, असे उदगार काढले. कोपरगाव तालुक्यातील दौर्यात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भेट घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना डॉ. पिपाडा यांनी राहाता शहरातील स्मशानभुमीचे फोटो दाखविले. स्मशानभुमीतील बैठक व्यवस्था असलेल्या शेडच्या पायर्यांना केलेली विद्युत रोशनाईचे फोटो पाहताच जणु काही आश्चर्य व्हावे अशी प्रतिक्रिया देत, ही खरंच स्मशानभूमी आहे ? अरे वाह…क्या बात है असे उदगार काढले. शेडमधील पायर्यांना एखाद्या बंगल्या सारखे बसविलेले ग्रेनाईट व त्यावरील स्वच्छता पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले. सर्व सुविधांयुक्त अद्ययावत अशी स्मशानभुमीचे काम राहाता शहरात पुर्ण झालेले आहे. स्मशानभुमीतील बैठक व्यवस्था असलेल्या शेडच्या पायर्यांना केलेली विद्युत रोशनाई आकर्षणाची भाग ठरली आहे. रस्त्यावरुन जाता येता रात्रीच्या वेळी जणु काही पंचतारांकीत हॉटेलचे गार्डनच आहे की काय असा पहाणा-याला भास होतो. तसेच या सुंदर अशा स्मशानभुमीची निगराणी राखण्यासाठी स्मशानजोग्याला वन रुम किचन चे घरही बांधुन दिले. या स्मशानभुमीचे वैभव पाहुन स्मशानजोग्याने त्याच्या मुलीचे लग्न स्मशानभुमीतच लावले. स्मशानजोग्याचा मुलगा व मुलगी स्मशानातच उच्चशिक्षित झाले. त्यामुळे सर्वत्र राहात्याच्या स्मशानभुमीची चर्चा आहे अशी माहिती डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी दिली. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड,आ.संजय शिरसाठ यांनीही स्मशानभुमीचे फोटो पाहुन माहिती घेतली.
COMMENTS