Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निर्यातबंदी हटली तरीही कांद्याचे भाव का कोसळले ?

नीलेश लंके यांचा जिल्हा उपनिबंधकांना सवाल

अहमदनगर ः केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याची घोषणा करूनही गुरूवारी नगर बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कोसल्याने कांदा उत्पादक शेतक

निलेश लंके आज आमदारकीचा राजीनामा देणार
सुसंस्कारी पिढी घडविण्याचे कार्य वाचनालयाच्या माध्यमातून होणार -आ. निलेश लंके
अखेर कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुटले

अहमदनगर ः केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याची घोषणा करूनही गुरूवारी नगर बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कोसल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडून जाब विचारला. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके हे बाजार समितीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शेतकर्‍यांच्या  भावना विचारात घेत जिल्हा उपनिबंधकांशी संपर्क करीत निर्यातबंदी हटविण्यात आल्यानंतरही कांद्याचे दर का कोसळले याचा जाब विचारला.
कांद्यावर निर्यातबंदी आणण्यात आल्याने गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर कोसळले होते. त्याविरोधात कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून  संतप्त भावना व्यक्त होत असताना लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटविली. या निर्णयानंतर भाव वाढतील या आशेने राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक झाली. परिणामी सुमारे 10 ते 12  रूपये किलोप्रमाणे दर कोसळले. पारनेर सह नगर तालुक्यात शेतक-यांच्या संताप दिसून आला. गुरूवारी नगर बाजार समितीमध्ये लिलाव सुरू झाल्यानंतर मोठया प्रमाणावर कोसल्याने शेतकर्‍यांच्या संतापाचा उद्रेकझाला. हे आंदोलन सुरू असतानाच मतदारांच्या भेटीसाठी आलेल्या आ. नीलेश लंके यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. देशातील तसेच राज्यातील सरकारला शेतक-यांच्या प्रश्‍नांशी देणे-घेणे नसून ते केवळ भांडवलदारांच्या हिताचा विचार करत आहेत.  सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांच्या शेतमालास हमीभाव देण्याची ग्वाही दिली होती. आज 10 वर्षे झाली, शेतकर्‍यांची काय अवस्था आहे ? त्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी बांधवांना न्याय देण्याची भुमीका शरद पवार हे कृषीमंत्री असताना त्यांनी कांद्याचे भाव वाढल्यानंतर निर्यातबंदीला साफ नकार देत शेतकरी बांधवांची बाजू घेतली. तेच कृषी मंत्री असताना शेतक-यांसाठी 72 हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आल्याची आठवणही आ. लंके यांनी यावेळी करून दिली. आमदार लंके यांनी यावेळी शेतक-यांना अश्‍वासित केले की, लोकसभा निवडणूकीनंतर कांद्याच्या प्रश्‍नावर आपण आंदोलन उभे करू. मी सदैव तुमच्या पाठीशी असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, रामदास भोर, बाळासाहेब बोराटे, अभिषेक कळमकर, संभाजी कदम, अमोल येवले, संग्राम कोतकर, शिवा पाटील होळकर, विक्रम राठोड, भाऊसाहेब काळे, राजेंद्र भगत, हर्षवर्धन कोतकर, अभिजित कोतकर, पोपट निमसे, गणेश तोडमल, भारत बोडखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

COMMENTS