Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालसंस्कार शिबिरे ही काळाची गरज ः श्री भास्करगिरीजी महाराज

बहिरवाडीतील वारकरी बालसंस्कार शिबीराला सुरूवात

नेवासाफाटा ः नेवासा तालुक्यातील तीर्थक्षेत्र बहिरवाडी येथे युवा कीर्तनकार हभप लक्ष्मण महाराज नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली  सुरू असलेल्या वारकरी

पत्रकार बोठेची रवानगी नाशिक कारागृहात
मटण दिले नाही म्हणून दोन गटात तुफान धुमश्‍चक्री ; हाणामारीत आठ जखमी
नागवडे सहकारी साखर कारखान्याचा हंगामाचा समारोप

नेवासाफाटा ः नेवासा तालुक्यातील तीर्थक्षेत्र बहिरवाडी येथे युवा कीर्तनकार हभप लक्ष्मण महाराज नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली  सुरू असलेल्या वारकरी बालसंस्कार शिबिराला देवगड येथील गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी भेट दिली. बालसंस्कार शिबिरातून चांगल्या विचारांची प्राप्ती होत असल्याने हे सुविचार शेवटच्या श्‍वासापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी बालसंस्कार शिबिरे ही गरजेची असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांनी यावेळी बोलताना केले.
                    बहिरवाडी येथे गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी श्री कालभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले येथील मंदिराच्या अग्रभागी सुरू असलेल्या गोपूराची त्यांनी पहाणी केली.यावेळी त्यांनी श्री कालभैरवनाथ संस्थानच्या सभामंडपात सुरू असलेल्या बालसंस्कार शिबिराला भेट दिली. यावेळी शिबीर संयोजक हभप लक्ष्मण महाराज नांगरे यांच्या हस्ते गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांचे संतपूजन करण्यात आले. यावेळी सुमारे दीडशे बालवारकर्‍यांशी सुसंवाद साधतांना गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले की, वारकरी बालसंस्कार शिबिरातून भावी पिढीतील ही बालके धर्माचे रक्षक होणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून सात्विकता व सुविचार वाढीस लागणार आहे. मातापिता व गुरुजन वर्ग मुलांना संस्कार देतात याच संस्काराने या पिढीचे जीवन फुलासारखे होणार आहे, चांगले काम करतांना विरोध हा होणारच मात्र त्याकडे दुर्लक्ष करून इतरांचे वाईट न करता आपले काम करत रहा यातूनच संस्कार व संस्कृतीचे जतन करणारी पिढी घडेल असा संदेश देऊन त्यांनी वारकरी बाल संस्कार शिबिराला शुभेच्छा दिल्या. यावेळी देवगडचे सेवेकरी हभप बाळू महाराज कानडे, रामनाथ महाराज पवार, विजय महाराज पवार, शांतीलाल वरखडे, दादा महाराज साबळे, श्री कालभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष अशोकभाऊ कोलते, विश्‍वस्त दिनकरराव हारदे, बी. जी. मिटकरे, सचिव दिलीपराव नळघे, सरपंच इंजिनिअर आनंद नांगरे, संतसेवक सुखदेव नांगरे, दामोदर नांगरे, डॉ.संतोष शेळके, नंदकुमार वाखुरे, संतसेवक सोमनाथ वाखुरे, भाऊसाहेब येवले, बहिरुतात्या कोरेकर, अंबादास लष्करे, अशोक नांगरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 19 दिवशीय वारकरी बालसंस्कार शिबिरासाठी शिबीर संयोजक लक्ष्मण महाराज नांगरे, रामनाथ महाराज पवार, अंकुश महाराज जगताप, दादा महाराज साबळे, विजय महाराज पवार, सुगम महाराज शिंदे, गणेश महाराज तनपूरे, भास्कर महाराज मुळक, सचिन महाराज पवार, शशिकांत महाराज कोरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असून गायन, मृदुंग वादन यासह वारकरी संप्रदायातील सुसंस्कारमय शिक्षण सदर शिबिरात दिले जात आहे. 15 मे रोजी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी  स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे.

COMMENTS