Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निकृष्ट चिकन शॉर्मा खाल्ल्याने एकाचा मृत्यू

मुंबई ः  मुंबईमध्ये रस्त्याशेजारी लागणार्‍या खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर चिकन शॉर्मा खाल्ल्याने एकाचा मृत्यू तर काही जणांना विषबाधा झाली आहे. ही

दहशतवाद्यांनी वापरलेल्या कारमध्ये सापडली काडतुसे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे औरंगाबाद येथे आगमन व प्रयाण l पहा LokNews24
यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर

मुंबई ः  मुंबईमध्ये रस्त्याशेजारी लागणार्‍या खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर चिकन शॉर्मा खाल्ल्याने एकाचा मृत्यू तर काही जणांना विषबाधा झाली आहे. ही घटना मानखुर्द येथे घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून विषबाधा प्रकरणाला कारणीभूत ठरणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रथमेश विनोद घोक्षे  (वय 19) असे विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर इतर काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत. या ठिकाणी परवानगी नसतांना खाद्य पदार्थांची विक्री केली जात असते.

COMMENTS